Pak Pak Pakaak Actress: 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीला बनायचं नाही आई, का घेतला असा मोठा निर्णय?

Last Updated:

Pak Pak Pakaak actress narayani shastri: असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पालक न बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे प्रत्येक कलाकारांचं काही न काही कारण आहे.

 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीला बनायचं नाही आई
'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीला बनायचं नाही आई
मुंबई : असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पालक न बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे प्रत्येक कलाकारांचं काही न काही कारण आहे. असाच निर्णय आणखी एका अभिनेत्रीने घेतलाय. तिने हा मोठा निर्णय घेण्याचं कारणही सांगितलं. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याविषयी खुलासा केला.
'पक पक पकाक' फेम अभिनेत्री नारायणी शास्त्रीला सर्वजण ओळखतात. ती आता टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिच्या लग्नाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र तिने आई न बनण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्री नारायणी शास्त्री आता 46 वर्षांची असून तिच्या लग्नाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिनेत्रीने एका मुलाखतीत आई न बनण्याचा निर्णय का घेतला याविषयी सांगितलं.
advertisement
नारायणी शास्त्रीचं म्हणणं आहे की, आई न बनण्याचा निर्णय खूप मोठा आहे. टेली टॉकसोबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, ती तिच्या बहिणी भावाच्या मुलांनाच आपली मुलं मानते. नारायणी म्हणाली, "मला कधी मनातून वाटलं नाही की मी आई बनावं. माझी चार बहिणी आणि एक भाऊ आहे. मी त्यांची काळजी घेते. त्यांना आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करते. त्यांच्यामुळे माझं आईपण पूर्ण झालं. माझं आहे ते सगळं त्यांचंच आहे."
advertisement
अभिनेत्री नारायणी शास्त्रीचा आई न बनण्याचा निर्णय
"एक मुलं असणं खूप मोठी जबाबदारी आहे. मी यासाठी तयार नाही. कारण मला माझ्या चांगल्या वाईट गोष्टी माहित आहेत. मला माहित आहे की मी किती बलिदान देऊ शकते. मी मुलांना जन्म दिला तर काम करणं बंद करेन. मी माझं १०० टक्के त्यांच्यावरच देईन. पण मला तसं करायचं नाही. मला काम करणं आवडतं. यातून मला आनंद मिळतो. माझा नवराही आनंदी आहे," असं नारायणी म्हणाली.
advertisement
दरम्यान, कोविडच्या काळातील आठवण सांगताना अभिनेत्री म्हणाली, "कोविडमध्ये मला वाटलं की मी आता काम करू शकणार नाही, तेव्हा मी माझं संतुलन सुटलं. सगळं ट्राय केलंय त्यामुळे मी आता हा निर्णय घेतला आहे. माझा नवरा एक फॅमिली पर्सन आहे. मी कामात व्यस्त असते तर तो फॅमिली फंक्शनला जातो. तो कधी खोटं बोलत नाही म्हणून मला पसंत आहे."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pak Pak Pakaak Actress: 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीला बनायचं नाही आई, का घेतला असा मोठा निर्णय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement