Bollywood Actress: मुस्लिम तरुणाशी लग्न! म्हणाली, 'किमंत मोजावी लागेल माहित होतं', अभिनेत्रीचं करिअर बुडालं, केला शॉकिंग खुलासा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये करिअर करणं आणि नाव कमावणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. कारण फ्लॉपचा शिक्का लागला किंवा थोड्या वेळासाठीही तुम्ही सिनेमापासून दुरावला तरीही लोक तुम्हाला विसरून जातात.
मुंबई : बॉलिवूडमध्ये करिअर करणं आणि नाव कमावणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. कारण फ्लॉपचा शिक्का लागला किंवा थोड्या वेळासाठीही तुम्ही सिनेमापासून दुरावला तरीही लोक तुम्हाला विसरून जातात. असं आजवर अनेक कलाकारांसोबत घडलं आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव असून तिनं तिच्यासोबत नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून स्वरा भास्कर आहे. ती बेधडक वक्तव्य आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिली. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिच्या राजकीय विचारसरणीमुळे तिला चित्रपटांमध्ये काम मिळणं बंद झाले आहे. बॉलीवूडने तिला ब्लॉक लिस्टच्या यादीत टाकल्याचं तिचं म्हणणं आहे.
advertisement
स्वरा भास्करने तिच्या करिअरमध्ये अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत, ज्यानंतर ती लोकांच्या मनात घर करून गेली. आपल्या प्रत्येक भूमिकेने तिने इंडस्ट्रीतही छाप पाडली. अनेक चित्रपटांतील त्यांच्या व्यक्तिरेखेवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र मुस्लिमांशी लग्न करून राजकारणात प्रवेश केल्याने या अभिनेत्रीचे करिअर बुडत आहे.
स्वरा भास्कर काय म्हणाली?
स्वरा भास्कर २०२२ मध्ये 'जहाँ चार यार' या चित्रपटात दिसली होती. आता ही अभिनेत्री लग्नानंतर अभिनयापासून दूर आहे. पण ती तिच्या राजकीय विचारसरणीमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती राजकारणावर ज्या स्पष्टवक्तेपणाने बोलते त्यामुळे तिच्या कारकिर्दीवर परिणाम होत असल्याचे तिला वाटते. बीबीसीशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या राजकीय विचारसरणीमुळे मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. आता असे म्हणणे कोणत्याही प्रकारे चुकीचे नाही. पण यामुळे माझ्या मनात फारशी कटुता निर्माण होत नाही. जेव्हा मी हा मार्ग निवडला तेव्हा मला माहित होते की मला त्याची किंमत मोजावी लागेल.'
advertisement
स्वरा भास्कर एक दमदार अभिनेत्री आहे. मनातील प्रत्येक गोष्ट ती मोकळेपणाने सर्वांसमोर मांडते. ती अनेकदा वादात सापडते. आता स्वरा म्हणते की तिला फिल्म इंडस्ट्रीतून ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. राजकीय विचारसरणीमुळे आपल्या कारकिर्दीवर परिणाम होऊन आपली अभिनय कारकीर्द ठप्प झाली आहे.
स्वरा म्हणते की तिला काम करायला आवडते आणि तिला पुढेही काम करायचे आहे. मात्र काम न मिळाल्याने त्याचा खूप त्रास झाला आहे. मी खूप सक्षम अभिनेत्री आहे आणि यापुढेही असाच राहीन अशी आशा आहे. त्यामुळे असे काम न मिळाल्याने मला त्रास होतो. पण यासाठी मी बॉलिवूडला दोष देत नाही. मी कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला दोष देणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Actress: मुस्लिम तरुणाशी लग्न! म्हणाली, 'किमंत मोजावी लागेल माहित होतं', अभिनेत्रीचं करिअर बुडालं, केला शॉकिंग खुलासा