advertisement

Bigg Boss Marathi 6 : नको बोलू Please! भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने असं काय सांगितलं; दिपाली सय्यदला रडू कोसळलं

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 मधील भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यात दिपाली सय्यद रडताना दिसत आहे. रितेश देशमुख दिपाली सय्यदबाबत काहीतरी सांगतो आणि तिला रडू आवरत नाही.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आज भाऊचा धक्का आहे. भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय होणार, कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहेच. पण भाऊच्या धक्क्यावर रितेशदाद कुणाला झापणार, कुणाची शाळा घेणार, कुणाची पोलखोल करणार हे पाहण्याची मजाही असते. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने दिपाली सय्यदबाबत असं काही सांगितलं की तिला रडू कोसळलं.
बिग बॉस मराठी 6 मधील भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यात दिपाली सय्यद रडताना दिसत आहे. रितेश देशमुख दिपाली सय्यदबाबत काहीतरी सांगतो आणि तिला रडू आवरत नाही. रितेश विशाल कोटियनने दिपाली आणि तन्वीबाबत केलेल्या वक्तव्याची पोलखोल करतो.
advertisement
रितेश म्हणतो, "विशाल कॉम्पिटिटर आणि हेटर्समध्ये फरक असतो. 'आय हेट दिपाली, आय हेट तन्वी, अरे दुकानातल्या सेल्स गर्ल्ससारखे दिसतात', असे शब्द तुम्ही वापरले. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राला हे आवडलंय?"
हे ऐकताच तन्वी आणि दिपाली यांना खूप वाईट वाटतं. दिपालीला तर रडूच कोसळतं. ती रडताना दिसते. रितेशचं बोलणं झाल्यावर विशाल म्हणतो, "दिपाली माझी चांगली मैत्रीण आहे". यावर दिपाली विशालला रोखते आणि म्हणते, "नको बोलूस प्लीज! चांगली मैत्रीण तर नकोच बोलूस"
advertisement
advertisement
विशालने दिपाली आणि तन्वीबाबत त्यांच्या पाठीमागे हे जे काही त्यांच्याबाबत वाईट शब्द वापरलेत, त्याची पोलखोल रितेशने भाऊच्या धक्क्यावर केली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
रितेशने रुचितालाही झापलं
रुचितानेही दिपालीसमोर आ थूं असं केलं. यावरून रितेशने रुचिताचीही शाळा घेतली. यावेळी तिने दिलेले एक्स्प्रेशन पाहून तर रितेश आणखीनच भडकला. अशांना भाऊच्या धक्क्यावर जागा नाही. उठ आणि निघ असं रितेशने रुचिताला सांगितलं. शेवटी तो बंद करा, असं म्हणतानाही दिसतो.
advertisement
त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर नेमकं आज काय होणार, हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : नको बोलू Please! भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने असं काय सांगितलं; दिपाली सय्यदला रडू कोसळलं
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement