advertisement

Maha Shivratri Vrat 2026: महाशिवरात्रीचा उपवास कधीपासून-कधीपर्यंत करावा; व्रताचे अचूक नियम-विधी, उपवास सोडण्याची वेळ

Last Updated:

Maha Shivratri Vrat 2026: हिंदू पंचांगानुसार माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी व्रत-उपवास केल्याने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत नक्की कधी सुरू करावे आणि कधी सोडावे...

News18
News18
मुंबई : शिवभक्तांना आस लागलेला महाशिवरात्रीचा सण रविवारी साजरा होत आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. हिंदू पंचांगानुसार माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी व्रत-उपवास केल्याने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे व्रत नक्की कधी सुरू करावे आणि कधी सोडावे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाशिवरात्री व्रत वेळ 2026 - महाशिवरात्री व्रताची सुरुवात 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी होईल आणि या व्रताची समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 06:59 नंतर केली जाईल. व्रताच्या दिवशी अन्नाचे सेवन करू नये, केवळ फलाहार करावा. शक्य असल्यास या दिवशी रात्री जागरण आवर्जून करावे.
महाशिवरात्री पूजा मुहूर्त 2026 -
advertisement
निशिता काळ पूजा वेळ - 15 फेब्रुवारी 2026 च्या मध्यरात्री 12:09 ते 01:01 पर्यंत
रात्रीचा प्रथम प्रहर पूजा वेळ - 06:11 PM ते 09:23 PM
रात्रीचा द्वितीय प्रहर पूजा वेळ - 09:23 PM ते 12:35 AM (16 फेब्रुवारी)
रात्रीचा तृतीय प्रहर पूजा वेळ - 12:35 AM ते 03:47 AM (16 फेब्रुवारी)
advertisement
रात्रीचा चतुर्थ प्रहर पूजा वेळ - 03:47 AM ते 06:59 AM (16 फेब्रुवारी)
महाशिवरात्री व्रत विधी -
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान शिवाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी. दिवसभर उपवास करावा आणि अन्नाचे सेवन अजिबात करू नये. या दिवशी फळाहार घेता येतो. संध्याकाळी पुन्हा एकदा पूजा करावी आणि महाशिवरात्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी. रात्री जागरण करून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यानंतर आपले व्रत सोडावे.
advertisement
यंदा महाशिवरात्री दिवशी सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग असेल. त्याशिवाय व्यतिपात योग, वरियान योग आणि ध्रुव योग देखील असेल. सूर्य-बुध कुंभ राशीत बुधादित्य राजयोग बनवतील, तर शुक्र-बुध लक्ष्मी नारायण राजयोग आणि सूर्य-शुक्र शुक्रादित्य राजयोग तयार करतील. विशेष म्हणजे महाशिवरात्री श्रवण नक्षत्रात येत आहे, ते महादेवाचे अत्यंत प्रिय नक्षत्र मानले जाते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Maha Shivratri Vrat 2026: महाशिवरात्रीचा उपवास कधीपासून-कधीपर्यंत करावा; व्रताचे अचूक नियम-विधी, उपवास सोडण्याची वेळ
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement