T20 World Cup : हार्दिक पांड्याच्या एक वाक्यामुळे इशान किशन आज खेळतोय वर्ल्ड कप, काय म्हटला होता?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ishan kishan On Hardik Pandya : इशान किशनच्या कठीण काळातून सावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी त्याला हार्दिक पांड्याने मोठी मदत केली.
ICC T20 World Cup 2026 : कानामागून आला आणि तिखट झाला, अशी म्हण जर कुणा एका खेळाडूला सुट होत असेल तर ती म्हणजे टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज इशान किशन याला... इशान किशन याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सिरीजमध्ये एन्ट्री मिळवली अन् आता तो टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील ओपनर ठरला आहे. याच इशान किशन याला दोन वर्षापूर्वी बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील घेतलं नव्हतं. अशातच इशान इथंपर्यंत कसा पोहोचला? असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल. पण तुम्हाला माहितीये का? हार्दिक पांड्यामुळे इशान किशन आज टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळतोय.
हार्दिक पांड्याने मदत केली
2024 मध्ये इशान किशनला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढण्यात आलं होतं. या कठीण काळातून सावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी त्याला हार्दिक पांड्याने मोठी मदत केली. मॅचनंतर ईशानने खुलासा केला की, जेव्हा तो संघातून बाहेर होता आणि टीकेचा धनी झाला होता, तेव्हा हार्दिकने त्याला अत्यंत मोलाचा सल्ला दिला होता.
advertisement
हार्दिकने ईशानला धीर दिला
2024 मध्ये जेव्हा ईशानचं बीसीसीआयसोबतच कॉन्ट्रॅक्ट संपलं, तेव्हा हार्दिक पांड्या स्वतः देखील कठीण टप्प्यातून जात होता. गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये आल्यानंतर त्याला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं होतं आणि टी-ट्वेंटी कर्णधारपदही त्याच्याकडून गेलं होतं. अशा स्थितीत हार्दिकने ईशानला धीर दिला. "हे तुझ्या हातात आहे की तुला नकारात्मक विचार करायचा आहे की कठोर मेहनत करून धावा करायच्या आहेत," असा स्पष्ट संदेश हार्दिकने ईशानला दिला होता, जो त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला, असं इशान म्हणतो.
advertisement
पडद्यामागे खूप घाम गाळला
दरम्यान, हार्दिक पांड्याने ईशानच्या खेळाचे कौतुक करताना म्हटलं की, गेल्या दोन वर्षांपासून त्याने पडद्यामागे खूप घाम गाळला आहे. "संधी मिळत नसतानाही तू हसत राहिलास आणि हार मानली नाहीस, याचं मला खूप कौतुक वाटतं," असे हार्दिकने यावेळी नमूद केले. त्याने ईशानला एकच मंत्र दिला होता की, सकाळी उठून मेहनत करायची आणि रात्री शांत झोपायचं, हेच चक्र सुरू ठेवले की यश नक्की मिळतं. हार्दिकच्या या मार्गदर्शनामुळेच ईशानने आज मैदानात उतरून सर्वांना उत्तर दिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 1:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : हार्दिक पांड्याच्या एक वाक्यामुळे इशान किशन आज खेळतोय वर्ल्ड कप, काय म्हटला होता?








