दिल्लीत झाला गौरव!
‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटातील शाहरुखचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता.
आज, २३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील एका भव्य सोहळ्यात त्याला हा पुरस्कार देण्यात आला. शाहरुख काळ्या रंगाच्या ‘बंधगला’ ड्रेसमध्ये खूपच हँडसम दिसत होता. जेव्हा त्याला पुरस्कार मिळाला, तेव्हा तो क्षण त्याच्या करिअरमधील एक ऐतिहासिक क्षण बनला. पुरस्कारासाठी शाहरुखचे नाव घोषित होताच सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने टाळ्यांच्या कडकडाटात शाहरुख खानचे अभिनंदन केले. त्याच्यासाठी हा क्षण खूपच हृदयस्पर्शी ठरला.
advertisement
शाहरुख खानचे आगामी चित्रपट कोणते?
शाहरुख खानने नुकताच त्याच्या मुलाच्या, आर्यन खानच्या पहिल्या सिरीजमध्ये खास भूमिका केली. आता तो त्याच्या पुढील चित्रपटासाठी तयारी करत आहे. त्याच्या पुढील चित्रपटाचं नाव ‘किंग’ आहे, ज्याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानही पहिल्यांदाच त्याच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.