करिअर देणारा वरचा देव असतो!
शोमध्ये शहनाज गिल स्टेजवर आली, तेव्हा तिने तिच्या भावाला शहबाजला घरात पाठवण्यासाठी सलमानला विनंती केली. त्याचवेळी तिने सलमानचं कौतुक करत म्हटलं की, “सर, तुम्ही खूप लोकांचं करिअर बनवलं आहे.” यावर सलमानने लगेच तिला थांबवत म्हटलं, “मी कुठे कोणाचं करिअर बनवलं आहे? करिअर बनवणारा फक्त वरचा देव असतो.”
advertisement
त्यानंतर, सलमानने थेट त्याच्यावर होणाऱ्या आरोपांवर उत्तर दिलं. तो म्हणाला, “माझ्यावर हा आरोपही केला जातो की, मी अनेकांचं करिअर बुडवलं आहे. पण, कोणाचं करिअर बुडवणं माझ्या हातात नाही. आजकाल तर हे बोललं जातं की, सलमान सगळ्यांचं करिअर खाऊन टाकेल. अरे, मी कोणाचं करिअर खाल्लं आहे? आणि जर मला खायचं असेल, तर मी आधी माझंच करिअर खाईन.”
सलमान एक गुंडा आहे!
सलमानच्या या वक्तव्यामागे एक मोठं कारण आहे. 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने नुकतंच सलमानवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनव म्हणाला होता, “सलमान कामात अजिबात लक्ष देत नाही. त्याला अभिनयात रस नाही. त्याला फक्त त्याच्या ‘सेलिब्रिटी पॉवर’चा आनंद घ्यायला आवडतो. तो एक गुंडा आहे.”
अभिनवने पुढे म्हटलं की, “सलमान खान बॉलिवूडच्या स्टार सिस्टीमचा जनक आहे. तो एका फिल्मी कुटुंबातून येतो आणि हीच मंडळी सगळं कंट्रोल करतात. जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, तर ते तुमच्या मागे लागतात.” सलमानचं हे स्पष्टीकरण अभिनवच्या आरोपांना दिलेलं उत्तर मानलं जात आहे.