फुटपाथवर झोपण्यासाठी द्यावे लागायचे ६ रुपये!
१९९३ साली जेव्हा अनुराग कश्यप मुंबईत आला, तेव्हा त्याच्याकडे राहायलाही घर नव्हतं. त्याला रस्त्यांवर रात्र काढावी लागली होती. अनुरागने सांगितलं, “त्यावेळी जुहू सर्कलच्या मध्ये एक गार्डन होतं. आम्ही तिथे झोपायचो, पण तिथून आम्हाला मारून हाकलून दिलं जायचं. मग आम्ही वर्सोवा लिंक रोडवर जायचो, जिथे मोठा फुटपाथ होता. तिथे लोक रांगेत झोपायचे, पण तिथे झोपण्यासाठी ६ रुपये द्यावे लागायचे.”
advertisement
पहिल्या पत्नीने घराबाहेर काढलं!
आयुष्याच्या या कठीण काळात अनुरागला दारूचं व्यसन लागलं. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी माझ्या पहिल्या पत्नीने आरती बजाजने मला दारूच्या व्यसनामुळे घरातून बाहेर काढलं होतं. माझी मुलगी त्यावेळी फक्त ४ वर्षांची होती. मी खूप डिप्रेशनमध्ये होतो.”
अनुरागने सांगितलं की, त्याचं पहिलं चित्रपट ‘पांच’ रिलीज होऊ शकला नाही. ‘ब्लॅक फ्रायडे’ सोबतही असंच घडलं. इतरही काही चित्रपट थांबले. त्याला ‘तेरे नाम’ आणि ‘कांटे’ मधून बाहेर काढलं गेलं. या सगळ्यामुळे तो खूप निराश झाला होता. पण, यातून बाहेर पडून त्याने 'गॅंग्स ऑफ वासेपूर' सारखे अनेक हिट चित्रपट दिले.