TRENDING:

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्ट दरम्यान सुनिधी चौहानला रडू कोसळलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:

सध्या सुनिधी कॉन्सर्टच्या माध्यमातून भारत दौरा करतेय. सुनिधीला भर कॉन्सर्टमध्ये रडू कोसळलं आहे. नेमकं गायिकेला काय झालं? जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच आपल्या गाण्यामुळे चर्चेत राहणारी सुनिधी सध्या एका खासगी कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सुनिधी भारत दौरा करतेय, तिने अलीकडेच लखनऊमध्ये कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्ट कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सुनिधी रडताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
News18
News18
advertisement

व्हायरल व्हिडिओमध्ये सुनिधी चौहानने खुलासा केला की तिला घशाचा त्रास होतोय, पण तरीही ती गाणार आहे. 7 मार्च रोजी लखनऊमध्ये एक कॉन्सर्ट इव्हेंट होता. त्यावेळी तिने एक वेस्टर्न गाऊन कॅरी केलेला होता. व्हिडिओमध्ये सुनिधी म्हणाली, "आज माझा घसा खूप दुखत आहे. त्यामुळे आज माझा आवाज खूपच वाईट आहे. पण मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्यासोबत आहात आणि मी गाणार आहे. माझ्यासोबत असं केव्हाच घडलं नव्हतं. कृपया मला माफ करा. मी नेहमीच संपूर्ण प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे आज सुद्धा 100 टक्के प्रयत्न करेल. पण ते नेहमीसारखे नसेल. म्हणून कृपया मला माफ करा. तुमच्या माझ्यावर करत असलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद..."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

सुनिधीला कॉन्सर्टवेळी चाहत्यांनी फार प्रोत्साहन देत तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला.सुनिधीबद्दल बोलायचे तर तिने अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. तिचे पार्श्वगायन खूप लोकप्रिय आहे. ती मैफिलींमध्येही जीव आणते. गन गन गन, तुझको ना देखून तो, मुझसे शादी करोगी, रिश्ता दिलों का, पास बुलाती है, ऐसा क्यों माँ, सामी सामी, दावत-ए-इश्क, क्रेझी किया रे, आणि आजा नचले हे तिची प्रसिद्ध गाणी आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्ट दरम्यान सुनिधी चौहानला रडू कोसळलं, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल