आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव आहे, 'परिंदा' (1989) या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या सिनेमाची सर्वात चर्चेची घटना म्हणजे सेटवर घडलेला किस्सा. एका सीनसाठी जॅकी श्रॉफने अनिल कपूरला तब्बल 17 वेळा थोबाडित मारली.
17 व्या वर्षी पळून जाऊन लग्न, मुलाचं अपहरण अन् नाईलाजाने बनावं लागलं अभिनेत्री
advertisement
जॅकी श्रॉफने अनिल कपूरला 17 वेळा थोबाडित मारण्याचं कारण म्हणजे, दिग्दर्शकाला परफेक्ट शॉट हवा होता. जॅकीने एका मुलाखतीत सांगितलं, "हवेत मारलेल्या थप्पडीनं रिअॅक्शन मिळत नाही. खरी थप्पडच स्क्रीनवर खरी वाटते."
‘परिंदा’ची गोष्ट दोन भावांच्या जीवनावर आधारलेली आहे. एक गुन्हेगारी जगतात ओढला जातो, तर दुसरा योग्य मार्गावर राहण्याचा प्रयत्न करतो. या कथेत वास्तववाद आणण्यासाठी कोणताही सेट उभारला गेला नाही. संपूर्ण शूटिंग खऱ्या मुंबईत गल्ल्या, बंदरे आणि लोकांच्या गर्दीत केलं गेलं.
स्टारकास्टमध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर होते. विशेष म्हणजे, नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच चित्रपटाच्या संपादनासाठी रेणु सलुजा यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.
‘परिंदा’नं फक्त राष्ट्रीय पुरस्कारच नाही, तर फिल्मफेअरमध्येही 5 मोठे पुरस्कार जिंकले. प्रेक्षक आणि समीक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं. कमी बजेट असूनही हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादाचं नवं पर्व घेऊन आला. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटात निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा तिन्ही भूमिका निभावल्या. त्यांच्या करिअरमधील हा टर्निंग पॉइंट ठरला. नंतर त्यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘3 इडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले.