तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी लिहिलंय, "बॉर्डर 2 तुमचे हृदय अभिमानाने भरून टाकतो. हा सिनेमा देशाला तसेच सशस्त्र दलांना सलाम करतो. जोरदार शिफारस केली जाते." त्यांनी दिग्दर्शक अनुराग सिंग यांचे कौतुक करत म्हटलंय, "त्यांनी एक शक्तिशाली, भावनिकदृष्ट्या भरलेला युद्धकथा सादर केली आहे हा सिनेमा कल्ट क्लासिक 'बॉर्डर' च्या वारशाचा सन्मान करतो."
advertisement
'बॉर्डर 2' सीन्स आणि म्युझिक
सिनेमाच्या वॉर सीन्सचं विशेषतः कौतुक होत आहे. तरण आदर्श यांनी लिहिलंय, सिनेमातील अॅक्शन सीन्स केवळ दाखवण्यासाठी नाही तर कथा आणि पात्रांच्या भावना पुढे नेण्यासाठी काम करते. त्यांनी त्यांच्या रिव्ह्यूमध्ये संवाद आणि संगीत हे चित्रपटाचे प्रमुख बलस्थान असल्याचं सांगितलं आहे. तरण आदर्श यांच्या मते, सिनेमाचे संवाद तीक्ष्ण, कठोर आणि देशभक्तीने भरलेले आहेत. अनेक पंचलाइनला थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या मिळत आहे. सिनेमात पहिल्या भागातील 'घर कब आओगे' आणि 'जात हुए लम्हो' ही गोणी रिक्रिएट करण्यात आली आहे.
'बॉर्डर 2'मधील कलाकारांचा अभिनय
अभिनयाबद्दल सांगायचं झाल्यास सनी देओलचे खूप कौतुक करण्यात आलं आहे आणि त्याला चित्रपटाचं 'धडकता हुआ दिल' म्हटलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, "सनी देओल हा सिनेमाचा आत्मा आहे. जेव्हा तो गर्जना करतो तेव्हा थिएटरमध्ये स्फोट होतो, विशेषतः त्याच्या पॉवर-पॅक्ड लाईन्ससह. हा विंटेज सनी देओल आहे. कमांडिंग, नीतिमान आणि अविस्मरणीय."
वरुण धवनला त्यांनी 'मोठे आश्चर्य' म्हटलं आहे. मजबूत लेखनात आणि चांगल्या कलाकारांच्या भूमिका कशा असाव्यात हे तो सिद्ध करतो. दिलजीत दोसांझला प्रत्येक सीक्वेन्समध्ये पाहणं आनंददायी आहे. अहान शेट्टीने अनुभवी कलाकारांसोबत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'बॉर्डर 2' ची कथा काय?
'बॉर्डर 2' ही वीरकथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच देशभक्ती आणि सैनिकांच्या बलिदानावर केंद्रित आहे. या चित्रपटात सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी त्याची निर्मिती केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अगदी आधी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. सिने ट्रेंडर्सचा असा विश्वास आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करू शकतो. कारण सिंगल स्क्रीनवर सनी देओलचे चाहते खूप आहेत.
