5 खंड, 34 शहरे आणि 79 शो
BTS चा हा दौरा अत्यंत भव्य असणार आहे. 20 मार्च 2026 रोजी त्यांचा नवा अल्बम रिलीज झाल्यानंतर, एप्रिल महिन्यापासून या दौऱ्याला सुरुवात होईल. दक्षिण कोरियातील 'गोयांग' शहरातून 9 एप्रिलला त्यांच्या या प्रवासाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा बँड जपान, उत्तर अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया असा प्रवास करत चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे.
advertisement
भारताचं नाव यादीत का नाही?
भारतीय चाहत्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे "BTS भारतात येणार का?" येणार असेल कर कधी येणार? तिकिट किती मिळणार? पण दुर्दैवाने, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या 34 शहरांच्या पहिल्या अधिकृत यादीत भारताचे नाव नाही. थायलंड, सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया यांसारख्या आशियाई देशांचा समावेश असला तरी, मुंबई किंवा दिल्लीचा उल्लेख नसल्याने भारतीय फॅन्समध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र, चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
निराश होण्याचं कारण नाही, कारण या दौऱ्याबाबत काही सकारात्मक संकेतही मिळत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, 2027 मधील काही तारखा आणि शहरे अजून जाहीर व्हायची आहेत. यामध्ये जपान आणि मध्यपूर्वेतील (Middle East) देशांसोबत भारताचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी BTS च्या 'व्ही' (V) ने एका लाइव्ह सेशनमध्ये चक्क "नमस्ते" म्हणत भारतीय फॅन्सना "पुढच्या वर्षी भेटू" असे संकेत दिले होते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात भारताचं नाव येण्याची दाट शक्यता आहे.
शिवाय BTS च्या मॅनेजमेंट कंपनीने मुंबईत आपले ऑफिस सुरू केले आहे, ज्यामुळे भारतात मोठा कॉन्सर्ट होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
तिकीट बुकिंग कधी सुरू होणार?
ज्यांना परदेशात जाऊन हा कॉन्सर्ट पाहायचा आहे, त्यांच्यासाठी तिकीट विक्री 22 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. आधी 'आर्मी' मेंबरशिप असलेल्यांना प्राधान्य मिळेल आणि त्यानंतर 24 जानेवारीपासून सर्वांसाठी तिकीट उपलब्ध असतील. स्वप्न पाहणं सोडायचं नाही! जरी पहिल्या यादीत भारत नसेल, तरी BTS चा भारतामधील मोठा चाहतावर्ग पाहता, २०२७ च्या शेड्युलमध्ये एखादा 'सरप्राईज' शो होण्याची आशा आपण नक्कीच ठेवू शकतो.
