पोलिसाच्या भूमिकेत धोनी आणि माधवन!
'द चेज' या टीझरमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि आर. माधवन दोघेही पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहेत. ते जोरदार गोळीबार करताना आणि अॅक्शन करताना दिसत आहेत. हा टीझर पाहून चाहते खूपच उत्साहित झाले आहेत, पण हा टीझर एका चित्रपटाचा आहे की जाहिरातीचा, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. टीझरमध्ये फक्त एवढंच सांगितलं आहे की, याला बसन बाला यांनी दिग्दर्शित केलं आहे, ज्यांनी अभिनेत्री आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं.
advertisement
आर. माधवनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “वन मिशन, टू फायटर्स! तयार व्हा, एक धमाकेदार ‘चेज’ सुरू होणार आहे.” या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “ओएमजी! माही आणि मॅडी, दोघेही एकत्र. हे खूपच रोमांचक आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “आशा आहे, हा एक चित्रपट असेल, जाहिरात नसेल, कारण टीझर खूपच दमदार आहे.”
आर. माधवन नुकताच फातिमा सना शेखसोबत नेटफ्लिक्सच्या 'आप जैसा कोई' या चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच दिग्दर्शक आदित्य धरच्या 'धुरंधर' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.