बॉलिवूड गायक कैलाश खेर यांचा ग्वालियरमध्ये 25 डिसेंबर रोजी लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. खेर आपल्या दमदार आवाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात पण इथे सगळा गोंधळ उडाला. भर कार्यक्रमात लोकांनी गोंधळ घातल्याने कार्यक्रम बंद करावा लागला.
( IIT Bombay मधून शिक्षण, पालथं घातलंय अख्ख जग, अजून काय काय करतो गायत्री दातारचा होणारा नवरा?)
advertisement
कैलाश खेर ग्वालियरमध्ये लाइव्ह शोसाठी आले होते. त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली. प्रेक्षकांमधील काही जणांनी सिक्युरिटी बॅरिकेट्स तोडत थेट स्टेजकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे आयोजकांसह सिक्युरिटी यंत्रणाही गोंधळून गेली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
ही परिस्थिती पाहून कैलाश खेर स्वतः स्टेजवरून प्रेक्षकांना चांगलंच झापलं. ते प्रचंड संतापले होते. "अशा पद्धतीने वागू नका. जनावरांसारखं वागणं शोभत नाही", असं म्हणत त्यांनी लोकांना सुनावलं. त्यांनी प्रेक्षकांना इशाराही दिला की, जर कोणी सिंगिंग इन्स्ट्रुमेंट्सकडे किंवा स्टेजकडे धाव घेतली तर शो तात्काळ बंद केला जाईल. परिस्थिती नियंत्रणात येत नाही हे लक्षात आल्यानंतर अखेर शो थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कलाकारांसोबत अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूर यांच्या लाइव्ह शोदरम्यान एक प्रेक्षक थेट स्टेजवर चढला होता. सिक्युरिटी गार्ड्सनी त्याला खाली उतरवलं. साऊथ अभिनेत्री सामंथा हिला देखील एका इव्हेंटदरम्यान गर्दीतून असभ्य वर्तनाचा सामना करावा लागला होता.
