'तलास' सिनेमातील धम्माल गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं हे ग्लॅमरस, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं 'या गो बायांनो हळद घेऊनशी...' हे गाणं रिलीज झालं आहे. गौतमी पाटीलनं यावर नृत्य केलं असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणं गायलं आहे.
advertisement
सिनेमाच्या या कार्यक्रमाला अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं हजेरी लावली होती. तेव्हा गौतमीचं कौतुक करत तिला भेटणं माझ्यासाठी फॅन मुमेंट असल्याचं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे हे कळलं तेव्हा माझ्यासाठी ती फॅन मुमेंट होती. मला सारखं असं वाटतं होतं की जिला आपण सारखं सारखं बघत असतो, इतक्या लोकांचा भरगोस प्रतिसाद मिळतो अशी स्टार आपल्याकडे येणार आहे. तर ती कशी असेल याची खूप उत्सुकता होती.
तिची मेहनत घेणं, तिला पटपट गोष्टी कळणं, नृत्यदिग्दर्शकाला, त्याच्या गाण्याला कोरिओग्राफीला, सिनेमॅटोग्राफरचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे. गौतमीचं खूप खूप कौतुक. चिन्मयीकडून कौतुक ऐकून गौतमी देखील भारावून गेली.
'तलास' या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'तलास'मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. या सिनेमात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत.
