स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अभिनव म्हणाला, "सलमानला अभिनयात काहीही रस नाही. तो गेल्या 25 वर्षांपासून खरी मेहनत करत नाही. शूटिंगवर येतो, पण जणू काही उपकार करत आहे असं वाटतं. त्याला फक्त स्टारडम आणि सेलिब्रिटी असण्याची ताकद दाखवायला आवडतं. पण कलाकार म्हणून त्याची बांधिलकी शून्य आहे. 'दबंग'च्या आधी मला हे माहीत नव्हतं. पण आता मला स्पष्ट सांगायचं आहे की तो एक घाणेरडा माणूस आहे."
advertisement
कोण आहे नव्या नायर? गजऱ्यामुळे आली अडचणीत, थेट 1.25 लाखांचा बसला फटका
अभिनव इथेच थांबला नाही. त्याने सलमानच्या संपूर्ण कुटुंबावर निशाणा साधला. "सलमान खान बॉलिवूडमधल्या स्टार सिस्टीमचा जनक आहे. तो 50 वर्षांपासून उद्योगात असलेल्या फिल्म फॅमिलीमधून आला आहे. ते लोक इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवतात. ज्यांनी त्यांना विरोध केला, त्यांचा करिअर उद्ध्वस्त करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. ते शिक्षा देतात, दडपशाही करतात."
अभिनव कश्यपने 2010 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दबंग’ हा सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामुळे सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनू सूद यात खलनायक होता. मलायका अरोराच्या ‘मुन्नी बदनाम’ गाण्याने धुमाकूळ घातला. अरबाज खान निर्माते होते, तर डिंपल कपाडिया, ओम पुरी, महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्गज कलाकारही यात झळकले.
‘दबंग’नंतर या फ्रँचायझीचे आणखी दोन भाग आले. 'दबंग 2' 2012 मध्ये आला जो अरबाज खानने दिग्दर्शित केला होता. 'दबंग 3' 2019 आला जो प्रभुदेवाने दिग्दर्शित केला. पण पहिल्या भागानंतर अभिनव कश्यप या मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतरपासून तो सलमान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध उघडपणे बोलताना दिसला आहे.
अभिनवच्या मते, 'दबंग'च्या यशानंतर त्याला पूर्ण क्रेडिट मिळालं नाही. इंडस्ट्रीत सलमानच्या प्रभावामुळे त्याला हवे तसे प्रोजेक्ट मिळाले नाहीत. यामुळे तो सलमानकडे कायम नाराज राहिला आहे.