दूरदर्शनच्या ऑफिशिअल सोशल मीडियावर अकाऊंटवर 'दामिनी 2.O'चा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. दामिनीच्या त्यात दर्जेदार शीर्षक गीतासह 'दामिनी 2.O' चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण यावेळी यात अभिनेत्री प्रतिक्षा लोणकरच्या जागी एक नवी अभिनेत्री पाहायला मिळत आहे.
advertisement
दामिनी 2.O च्या प्रोमोमध्ये का?
"अन्यायाविरुद्ध नेहमीच ठामपणे उभी राहिलेली निर्भीड पत्रकार दामिनी पुन्हा एकदा आपल्यासमोर येतेय... नव्या रुपात नव्या ताकदीसह. फक्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर", असं म्हणत मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये पत्रकार दामिनी त्याच कॉन्फिडन्समध्ये कॅमेरासमोर उभी राहून रिपोर्टिंग करताना दिसतेय.
कोण आहे नवी दामिनी?
1997 ते 2007 या काळात दामिनी ही मालिका दूरदर्शन सह्याद्रीवर सुरू होती. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर हिनं दामिनीची जबरदस्त भूमिका साकारली होती. दामिनी ही मालिका अभिनेत्री प्रतिक्षा लोणकरच्या करिअरला कलाटणी देणारी मालिका ठरली. या मालिकेनं तिना नवी ओळख मिळवून दिली.
आता दामिनी 2.O मध्ये अभिनेत्री सुप्रिती शिवलकर ही दामिनीची भूमिका साकारणार आहे. "ती परत येत आहे. तशीच विज पुन्हा कडाडणार. लवकरच..!!" असं म्हणत सुप्रितीनं तिच्या सोशल मीडियावर दामिनीच्या शूटींगचे काही फोटो शेअर केलेत. सुप्रिती शिलवकर ही थिएटर आर्टिस्ट आहे. नुकतीच ती लक्ष्मीनिवास या मालिकेत सुपर्णाच्या भूमिकेत दिसली होती.
दामिनी 2.O चा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. काही संमिश्र प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत. एका युझरनं कमेन्ट करत लिहिलंय, "ओरिजिनल दामिनीपण हवी होती." दुसऱ्याने लिहिलंय, "फक्त सिरीयलचा टायमिंग व्यवस्थित ठेवा." आणखी एकाने लिहिलंय, "हे गाणं ऐकलं की त्यावेळीच भारीच वाटायचं."
आता दामिनी 2.Oमध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार, नवी दामिनी कशी असणार, मालिका कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.