दशावतार
महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात, गणेशोत्सवासोबतच दशावतार ही कलापरंपरा दिमाखात साजरी केली जाते. या सांस्कृतिक परंपरेला मोठा सलाम करत 'दशावतार' हा भव्य मल्टीस्टारर सिनेमा प्रेक्षकांसमोर येत आहे.
या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची भक्कम फौज लाभली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. टीझरची झलक तर न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे. सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. हा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
advertisement
बिन लग्नाची गोष्ट
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा देखील 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. नात्यांची नवी परिभाषा सांगणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा सिनेमा नात्यांचा आरसा ठरणार आहे.
आरपार
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर हे टेलिव्हिजनचे दोन सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. प्रेमात वेड लावायची ताकद असते तुम्हाला फक्त पार्टनर चांगला मिळाला पाहिजे, अशी टॅगलाइन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
हा सिनमा मुळात लव्ह स्टोरी आहे. रोमान्स, थ्रिलर, सस्पेन्स आणि इमोशन्सनी भरलेला हा सिनेमा देखील 12 सप्टेंबरला थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.
एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे
एकीकडे मराठी सिनेमाला स्क्रिन मिळत नाही अशी खंत असते. आता एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज करण्याचं धाडसी पाऊल निर्मात्यांनी उचललं आहे. तिन्ही सिनेमांचे विषय आणि जॉनर वेगळे असले तरी नेमका कोणता सिनेमा पाहावा असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांना पडला आहे. एकीकडे कोकणातील दशावतार, ज्यात दमदार स्टारकास्ट आहे. दुसरीकडे बिन लग्नाची गोष्ट, ज्यात नात्यांची नवी परिभाषा दाखवण्यात आली आहे. आणि तिसरा सिनेमा म्हणजे आरपार, ज्यात रोमान्स आणि इमोशन्स खचाखच भरलेत.
प्रेक्षकांची पसंती कोणाला?
आता पहिल्या प्रेक्षका कोणता सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करणार? कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार? हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. पहिल्या दिवशी तुम्ही कोणता सिनेमा पाहाणार? तीन मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्याचा निर्मात्यांचा हा निर्णय तुम्हाला पटतो का? आम्हाला नक्की कळवा.