काही दिवसांपूर्वीच रितेशचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात तो पापाराझींशी मराठीत बोलताना दिसला. पण याच व्हिडिओवरून रीलस्टार आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम पुनीतने रितेशवर एक वादग्रस्त आणि खालच्या पातळीची टीका केली. पुनीतच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याचा समाचार घेतला. अशातच आता रितेशची बाजू घेत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता धनंजय पोवार म्हणजेच सर्वांच्या 'डीपी'ने पुनीतला कडक शब्दांत झापलं आहे.
advertisement
काय म्हणाले डिपी भाऊ?
धनंजय पोवारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत पुनीतला चांगलंच सुनावलं. डिपी भाऊ म्हणाला, "या पुनीत सुपरस्टारला थोडी अक्कल असली पाहिजे, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत, त्यांची पार्श्वभूमी तुला माहीत आहे का? रितेश देशमुख आणि त्यांचं कुटुंब, ते आपल्या घरच्यांबरोबर आणि मुलांबरोबर ज्या प्रकारे वागतात, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक संस्कारी व्यक्ती म्हणून आम्ही पाहतो. आम्ही त्यांना आदर्श मानतो. शिवाय महाराष्ट्रातीलही बरेच जण त्यांना आदर्श मानतात."
"2-3 कानाखाली मारून..." मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी! मारहाण करणाऱ्यांचे पिळले कान
धनंजय पुढे म्हणाला, "पुनीत, तू त्यांना कोणत्या थराला जाऊन बोलत आहेस. तुझी लायकी नसताना तू बोलू नकोस. 'लायकी' हा शब्द वापरणं कदाचित चुकीचं असेल. पण तू जे व्हिडिओ बनवतोस, त्यातून तुझे विचार कळतात. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट बोलू नकोस." धनंजय पोवारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे आणि त्याच्या भूमिकेला अनेकजण पाठिंबा देत आहेत.
रितेशला कलाकार आणि चाहत्यांचा जोरदार सपोर्ट!
काही कारणास्तव धनंजय पोवारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ उपलब्ध नाही. मात्र सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरलं आहे. विशेष म्हणजे, पुनीतच्या या टीकेवर रितेश देशमुख किंवा त्याच्या टीमकडून अजूनतरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण धनंजय पोवार एकटाच नाही, तर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून रितेशला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय. पुनीतने रितेश देशमुखसारख्या मोठ्या आणि लोकप्रिय कलाकारावर अशी वैयक्तिक टीका केल्यामुळे अनेकजण संतापले आहेत. 'रितेशने मराठीत बोलून काहीही चुकीचं केलं नाही' अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
