“‘त्यांना भीती आहे, म्हणून त्यांनी खोटं पसरवलं!”
नुकतंच धनश्री वर्मा ‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये अरबाज पटेलशी बोलत होती. यावेळी तिने तिच्या आणि युजवेंद्रच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दलच्या या सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आणि बनवलेल्या आहेत. मी त्यांना आधीच मागे सोडलं आहे.”
यावर अरबाज पटेलने तिला विचारलं की, तिच्यावर युजवेंद्रला धोका दिल्याचा आरोप झाला, त्याबद्दल तिला काय वाटतं? यावर धनश्रीने एक खूपच मोठा खुलासा केला. ती म्हणाली, “ते लोक हे सगळं पसरवणारच ना. त्यांना भीती आहे की, मी माझं तोंड उघडलं तर काय होईल. ते म्हणूनच मला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.” धनश्री पुढे म्हणाली, “अरबाज, जर मी एक-एक गोष्ट सांगितली, तर तुम्हालाही धक्का बसेल.” तिच्या या बोलण्याने सगळ्यांनाच शॉक बसला.
घटस्फोट झाल्यानंतर रडली होता धनश्री वर्मा
याआधीही ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत धनश्रीने घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्रने घातलेल्या ‘बी युवर ओन शुगर डॅडी’ या टी-शर्टबद्दल भाष्य केलं होतं. तिने सांगितलं होतं की, जेव्हा तिने युजवेंद्रला त्या टी-शर्टमध्ये पाहिलं, तेव्हा तिला खूप धक्का बसला. कारण, ती घटस्फोटासाठी मानसिकदृष्ट्या तयार होती, पण युजवेंद्र असं काहीतरी करेल, याची तिला अपेक्षा नव्हती. ती म्हणाली की, जेव्हा घटस्फोटाची घोषणा झाली, तेव्हा ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि खूप रडली.