Fa9la वर गौतमीचा स्वॅग
नेहमी लावणीच्या तालावर, घुंगरांच्या आवाजात आणि शिट्ट्यांच्या गजरात प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील यावेळी एका वेगळ्याच रूपात समोर आली आहे. अक्षय खन्नाच्या 'Fa9la' या गाण्याचा ट्रेंड सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय आणि गौतमीनेही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही.
advertisement
तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गौतमीचा लूक एकदम कॅज्युअल आहे. मोकळे केस, डोळ्यांवर काळा गॉगल आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून दिलेले कातिल एक्स्प्रेशन्स... चाहत्यांना या व्हिडिओने वेड लावलं आहे. अक्षय खन्नाच्या त्या हुकस्टेप्स गौतमीने इतक्या सहजपणे केल्या आहेत की, पाहणारा प्रत्येकजण तिच्या अदाकारीचा फॅन झाला आहे.
गौतमीच्या व्हिडीओवर चाहत्यांचा कल्ला
गौतमीने हा व्हिडिओ पोस्ट करताच कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तिची ही स्टाईल पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. एका चाहत्याने लिहिलंय, "मस्त हा मस्त! हीच खरी हिरोईन," तर दुसऱ्याने लिहिलंय, "परफेक्ट! अक्षय खन्नाला तोडीस तोड डान्स!" सोशल मीडियावर या व्हिडिओला अवघ्या काही तासांत हजारो व्ह्यूज मिळाले असून, हार्ट इमोजींचा जणू पूर आला आहे.
'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्ना 'रहमान डकैत' ची भूमिका साकारत आहे. या गंभीर पात्राची गाण्यातील एन्ट्री आणि त्यानंतरचा तो मजेशीर डान्स सध्या प्रत्येकाच्या 'रील्स'मध्ये पाहायला मिळतोय. केवळ गौतमीच नाही, तर अनेक बड्या सेलिब्रिटींनीही अक्षयच्या या डान्सवर व्हिडिओ बनवले आहेत. पण गौतमीच्या व्हिडिओची चर्चा काही वेगळीच आहे.
