फिनिक्स युनायटेड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष स्क्रीनिंगमध्ये बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांने व्हिडीओ कॉलवरुन सहभाग घेतला. संजय दत्तला पाहून उपस्थित तरुणांचा उत्साह आणि आनंद वाढला. यावेळी तरुणांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये तरुणांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर विशेष भर दिला. आमदार डॉ. राजेश्वर सिंह यांनी सांगितले की, "तरुणांना योग्य विचार आणि दिशा देण्यासाठी ही फिल्म एक महत्त्वाची पाऊल आहे." अशा आयोजनांमुळे तरुण पिढीला देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजण्यास मदत होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
धुरंधर सिनेमात संजय दत्त याने स्पेशल पोलीस ऑफिसची भूमिका बजावली आहे. ल्यारी भागात रहमान डकैतला संपवण्यासाठी त्याचा एन्काउंटर करण्यासाठी संजय दत्तने स्पेशल फोर्स उभं केलेलं असतं. रणवीर सिंह जो मुख्य पात्र दाखवला आहे. तो या सगळ्यात संजय दत्तची शेवटी मदत करतो असं दाखवण्यात आलं आहे. याचा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी येणार असल्याची माहिती मिळाली आहे. धुरंधरचा शेवट सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या भागाची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.
रहमान डकैत याचा खरंच मृत्यू झाला असेल का? तो जिवंत आहे हे रणवीर सिंहला माहिती असेल का? संजय दत्त जो स्पेशल पोलीस ऑफिसर दाखवला आहे त्याची भूमिका पुन्हा नव्या भागात पाहायला मिळणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रणवीरचं स्वप्न पूर्ण होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला मिळणार मिळतील अशी आशा आहे.
सॅकनिकच्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर' चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या २२ व्या दिवशी १५ कोटी रुपयांची कमाई केली असून, भारतातील या चित्रपटाची एकूण कमाई आता ६४८.५० कोटी रुपये झाली आहे. जागतिक स्तरावर (वर्ल्डवाइड कलेक्शन) या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला असून, एकूण १००३ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे.
