TRENDING:

Dhurandhar मध्ये 40 वर्ष जुन्या गाण्याचा रिमेक, पाकिस्तानी गायकाला केलं मालामाल; आदित्य धरने डॉलरमध्ये मोजले पैसे

Last Updated:

आदित्य धरचा धुरंधर आणि धुरंधर 2 बॉक्स ऑफिसवर गाजत आहेत. सिनेमातील त्या ट्रेंडिंग गाण्यासाठी आदित्य धरने पाकिस्तानी गायकाला डॉलरमध्ये पैसे दिलेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आदित्य धरच्या 'धुरंधर'ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता चित्रपटाचा दुसरा भागही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. 19 मार्च रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं आतापर्यंत 500 कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.  अक्षय खन्ना, रणवीर सिंग, सारा अली खान, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्या चित्रपटात अनेक रिमिक्स आणि रिमेक होते. fa9la या गाण्यानं पहिल्या भागात धुमाकूळ घातला. त्यानंतर आता 'हवा हवा' हे गाणं हिट ठरतंय.
News18
News18
advertisement

'धुरंधर'च्या टायटल ट्रॅकचीही खूप चर्चा झाली होती ज्यात पंजाबी लोकशैली आणि आधुनिक हिप-हॉप यांचं मिश्रण होतं.  या ट्रॅकने चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये मोठी भूमिका बजावली. चित्रपटात मूळतः सहा गाणी होती, परंतु एकूण 11 ट्रॅक उपलब्ध होते त्यापैकी अनेक क्लासिक गाण्यांचे रिमेक होते.

( काचेचे पॅनल, फिरता मार्बलचा जिना; पाकिस्तानात नाही, तर भारतातील 'या' गावात आहे हमजा-यालीनाचा आलिशान बंगला )

advertisement

आदित्य धरने 'धुरंधर'मध्ये 40 वर्षे जुनं गाणं वापरलं आहे. 'हवा हवा' हे गाणं सध्या खूप लोकप्रिय होत आहे.  'धुरंधर'मध्ये हे 40 वर्षे जुने गाणे ईडीएम संगीत आणि आकर्षक बीट्ससह पुन्हा तयार करण्यात आले. हे गाणे आजच्या तरुण पिढीच्या प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. या गाण्याचा मूळ गायक पाकिस्तानी आहे. 1987 मध्ये प्रदर्शित झालेले 'हवा हवा' हे गाणे पाकिस्तानी पॉप गायक हसन जहांगीर यांनी गायलं होतं.

advertisement

अलीकडेच हसन जहांगीर यांनी एका पाकिस्तानी शोमध्ये खुलासा केला की, 'धुरंधर'च्या निर्मात्यांनी त्यांच्याकडे गाणं वापरण्याची परवानगी मागितली होती आणि त्यासाठी त्यांना मोठी रक्कम दिली होती. ते म्हणाले, 'हवा हवा'च्या वापरासाठी निर्मात्यांनी त्यांना 50,000 डॉलर्स दिले. म्हणजेच भारतीय चलनानुसार  अंदाजे 46 लाख.

जहांगीर म्हणाले की, पूर्वी कॉपीराइट कायदा नव्हता. पूर्वी जे लोक गाणे वापरायचे ते पैसे देत नसत पण आता ते देतात.  त्यांनी आपल्या देशाच्या 'पाकिस्तान आयडॉल' या रिॲलिटी शोसाठी हे गाणं वापरायला दिलं होतं त्यासाठी त्यांनी कोणतीही रक्कम आकारली नव्हती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

आता 'धुरंधर' सिनेमानं 300 - 350 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1300 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती पण जेव्हा तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा तो टॉप 10 मध्ये ट्रेंड झाला. पाकिस्तानी प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला. आता धुरंधर 2 ने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. येत्या काळात हा सिनेमा त्याच्या पहिल्या भागाचा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar मध्ये 40 वर्ष जुन्या गाण्याचा रिमेक, पाकिस्तानी गायकाला केलं मालामाल; आदित्य धरने डॉलरमध्ये मोजले पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल