TRENDING:

“नजरेत अंगार, मुद्रेत रणधैर्य, तेजस्वी अवतार!” ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ मधील शिवरायांचा पहिला पोस्टर समोर

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून शिवप्रेमींमध्ये ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार आहे? याची झलक समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'श्री शिवराज अष्टक' मालिकांमधून शिवप्रेमींच्या मनामध्ये घर निर्माण करून राहिलेले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवप्रेमींमध्ये ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार आहे? याची झलक समोर आली आहे. अलीकडेच भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या मराठी चित्रपटातील प्रसंगाचे सादरीकरण पार पडले.
News18
News18
advertisement

भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ हे सगळंच अगदी भारावून टाकणारं… आणि सोबतीला भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार यांसह घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले आणि एकच जल्लोष झाला… निमित्त होते ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाच्या सादरीकरणाचे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे.

advertisement

पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित‍ आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून शिवराज अष्टकेतील सहावे पुष्प आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. शिवराज अष्टकेतील सहाव्या पुष्पामध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे. या चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ गीताचे दमदार सादरीकरण यावेळी करण्यात आले. दिग्पाल लांजेकर यांनी हे गीत लिहिले असून अवधूत गांधी, अमिता घुगरी यांचा स्वरसाज गीताला लाभला आहे. अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचे संगीत गीताला लाभले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सहा ठिपक्यांची लिपी, अंध बांधव वाचतात कसे? 'ब्रेल डे' म्हणजे काय? Video
सर्व पहा

चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. 'मुगाफी पल्स’ हे ॲप्लिकेशन वापरून या चित्रपटाच्या पटकथेचे विश्लेषण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
“नजरेत अंगार, मुद्रेत रणधैर्य, तेजस्वी अवतार!” ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ मधील शिवरायांचा पहिला पोस्टर समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल