TRENDING:

Bigg Boss Marathi 6: ना हाणामारी ना राडा...तरी एका वाक्यामुळं दिव्याला बिग बॉसने दाखवला घरातून बाहेरचा रस्ता...

Last Updated:

दिव्या शिंदे हिला बिग बॉसने आजच्या एपिसोडमध्ये घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तिला तिच्या एका वाक्यामुळे बिग बॉसचं घर सोडावं लागत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सध्या स्पर्धकांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगताना दिसतेय. स्पर्धकांमध्ये आपआपसात टास्कच्या वेळी किंवा संवाद साधताना हमरी तुमरी रंगताना दिसतेय. आता अशातच दिव्या शिंदे हिला बिग बॉसने आजच्या एपिसोडमध्ये घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तिला तिच्या एका वाक्यामुळे बिग बॉसचं घर सोडावं लागत आहे. सध्या चौथा आठवडा सुरू आहे. चौथ्या आठवड्याच्या मधल्या टप्प्यामध्येच बिग बॉसने एलिमिनेशन केलं आहे.
Bigg Boss Marathi 6: ना हाणामारी ना राडा...तरी एका वाक्यामुळं दिव्याला बिग बॉसने दाखवला घरातून बाहेरचा रस्ता...
Bigg Boss Marathi 6: ना हाणामारी ना राडा...तरी एका वाक्यामुळं दिव्याला बिग बॉसने दाखवला घरातून बाहेरचा रस्ता...
advertisement

दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना तलवारची धमकी देणं महागात पडलं आहे. ऑन कॅमेरा दिव्याने घरातील स्पर्धकांना तिच्याकडे असलेल्या तलवारीची धमकी दिली आहे. त्यामुळे घरातील स्पर्धक तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. बिग बॉसने तिला समजावण्याचा प्रयत्न देखील केला शिवाय, तिला माफी मागायला सुद्धा लावली परंतु तिने कोणाचीही माफी न मागता खेळ खेळायला लागली. परंतु बिग बॉससह सर्व स्पर्धकांनी एका मताने दिव्याला घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून तिला शुक्रवारी झालेल्या एपिसोडमधून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे.

advertisement

दरम्यान, बिग बॉस मराठीचा सहावा सीझन म्हणावा तसा काहीच चालत नाहीये. म्हणजे सतत भांडणं, नीट टास्कही खेळले जात नाही. सतत नियमांचं उल्लंघन, बिग बॉसने वारंवार समजावलं पण कुणीच ऐकलं नाही. पुन्हा जैसे थे परिस्थिती. त्यामुळे बिग बॉस आता मात्र भडकले आहेत. घरातील नियमांचे तीनतेरा करणाऱ्या सदस्यांना बिग बॉस घरातून हाकलून देणार आहे. अशातच आता दिव्या शिंदेला चौथ्या आठवड्याच्या मध्यातच तिला घराबाहेर काढलं आहे. दिव्या शिंदेनंतर कोणकोणत्या स्पर्धकांना बिग बॉस घराबाहेर काढणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. बिग बॉसने हा आत्ता ट्रेलर दाखवला आहे. पुढे आणखी बिग बॉस काय काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं बसणार आहे.

advertisement

नेमकं काय घडलं?

बिग बॉस यांनी स्पर्धकांना एक टास्क दिला होता, ज्यात प्रत्येक स्पर्धकाने त्यांना घरात राहण्यास अपात्र वाटणाऱ्या कोणत्याही दोन स्पर्धकांची नावं सांगत त्यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाच्या पेंटने फुली मारायची होती. त्यानुसार स्पर्धकांनी आपली नावं सांगितली. तन्वी कोल्तेने दिव्या शिंदेचं नाव घेत, ती घरात राहण्यास अपात्र असल्याचे सांगितले. यानंतर दिव्याने घरातील काही स्पर्धकांना अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिली. दिव्या म्हणाली, "माझ्या कानावर येतं की मी बाहेरच्या गोष्टी या घरात बोलते. पण मी अशाप्रकारचं काहीही बोललेले नाही. या घराबाहेर माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी या घराबाहेर गेल्यावर ती चालवणार नाही. या घरात जे जे माझ्याबद्दल बोलत आहेत, त्यांच्यावर ती तलवार चालणार."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

यानंतर घरात एकच गदारोळ झाला. तन्वी, अनुश्री आणि रुचिताने दिव्यावर धमकी दिल्याचा आरोप केला. दिव्यानेही हे मान्य केलं की ही धमकीच आहे. प्रकरण हाताबाहेर जाताना दिसताच बिग बॉसने मध्यस्थी करत दिव्या यांना कठोर शब्दात सुनावले. त्यांनी दिव्या आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावत या घटनेचे गांभिर्य समजावले. दिव्याने बिग बॉसकडे दिलगिरी व्यक्त केली असली तरीही घरातील कोणाचीही माफी मागण्यास तिने नकार दिला. परिणामी, दुसऱ्या दिवशी बिग बॉसने दिव्या शिंदेला नियमांचा भंग केल्याप्रकरणी घराबाहेर काढले.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6: ना हाणामारी ना राडा...तरी एका वाक्यामुळं दिव्याला बिग बॉसने दाखवला घरातून बाहेरचा रस्ता...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल