डीपी दादा म्हणाले, "आम्ही मित्र तिरुपतीला गेलो होतो. परत येताना रिझर्वेशन दोन दिवस उशिरा होतं. काम झालं होतं आणि दर्शन झालं होतं म्हणून परत जायला निघालो. आम्ही सगळे मित्र विनातिकीट ट्रेनमध्ये बसलो. रात्रभर टीसी समोरून गेला की उगाचच काहीतरी गुणगुणत राहायचं. शेवटी आम्हाला एक फॉरेनर मिळाला. आमचा आणि इंग्रजी फार मोठा वांधा आहे. त्याला रात्रभर बोलायला कोण नव्हतं. त्याने बिरयाणी वगैरे मागवलं होतं. आम्ही त्याच्याबरोबर रात्रभर या या या करत होतो. टीसी समोरून जायचा तेव्हा आम्ही त्याच्या पुढ्यातली बिरयाणी खात बसायचो".
advertisement
( सगळ्यांना हसवणारे डीपी दादा जेव्हा ढसाढसा रडतात, बाप-लेकाचं प्रेम पहिल्यांदा जगासमोर,VIDEO )
ते पुढे म्हणाले, "त्याच ट्रेनमध्ये रात्री मी भिक मागितली होती. ती ही असंच. आमचं चॅलेंज लागलं होतं की ट्रेनमध्ये भीक मागायची. माझे वडील इचलकरंजीमध्ये फार प्रतिष्ठित नागरिक आहेत. माझ्या गळ्यात सोन्याची चैन होती तर मी शर्ट काढून, बनीयन आणि अंडरवेअरवर ट्रेन पुसत पुसत भिक मागितली आहे".
"त्यातला योगायोग इतका मोठा की, आमच्या वडिलांचे मित्र मी असा करायला ( भिक मागण्यासाठी हात पुढे करायला ) आणि ते समोर यायला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर राम कृष्ण हरी. ते त्यांच्या घरी आणि पायताण आमच्या घरी", असेही डीपी दादांनी सांगितलं.