राजेश्वरी खरात लवकर 'कलवरी' या तिच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील तिचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं नाव आहे, ‘मखमली’.
मुंबईच्या पावसाने अमिताभ बच्चनलाही सोडलं नाही, बंगल्यात शिरलं पाणी; VIDEO व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. आता पूर्ण गाणं यूट्यूबवर आलं आणि चाहत्यांनी कमेंट्स, शेअर्स, लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला. गाण्यात राजेश्वरीचा आतापर्यंतचा सर्वात रोमँटिक आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो. तिच्यासोबत अभिनेता राहुल दराडचा खास अंदाज प्रेक्षकांच्या नजरा खेचतो.
advertisement
‘मखमली’ हे गाणं प्रदीप बी. टोंगे यांनी लिहिलं असून, त्याचबरोबर मंगेश वैजिनाथ शेंडगे यांच्या दिग्दर्शनात हे गाणं खास ग्रामीण पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलं आहे. हिरवीगार शेती, नदीकिनारा, गावाकडचं निरागस वातावरण यामुळे गाण्याला अधिकच आकर्षक रंग चढला आहे. गायक ओंकार स्वरूपचा आवाज गाण्याला वेगळीच झिंग देतो.
राजेश्वरी खरातने ‘फँड्री’ चित्रपटातून शालूच्या भूमिकेतून दमदार पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिच्या अभिनयातील नैसर्गिकता, साधेपणातली देखणी छबी आणि प्रामाणिक मेहनतीमुळे ती थेट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली. मात्र, इंडस्ट्रीतील गटा-तटांमुळे तिच्या करिअरला काही अडथळे आले, तरीही राजेश्वरीने हार मानली नाही. ती सतत नवनवीन भूमिका आणि प्रयोगशील प्रकल्पांतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
आज ‘मखमली’मुळे राजेश्वरी पुन्हा चर्चेत आली आहे. चाहत्यांना तिचा हा रोमँटिक अंदाज एकदम नवीन वाटतोय आणि सोशल मीडियावर तिच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राजेश्वरी खरातचा 'कलवरी' सिनेमा 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.