नेमकं काय होतं 'ते' वादग्रस्त विधान?
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिल्पाला विचारण्यात आलं की, तिच्या अनुपस्थितीत शुभांगीने हे पात्र कसं निभावलं? त्यावर शिल्पा म्हणाली होती, "शुभांगी एक उत्तम अभिनेत्री आहे, पण कॉमेडी करणं ही प्रत्येकाच्या कुवतीची गोष्ट नाही. कोणाची तरी नक्कल करणं खूप कठीण असतं आणि त्यावर प्रचंड दडपण असतं." शिल्पाचं हे बोलणं नेटकऱ्यांना आणि इंडस्ट्रीतल्या इतर काही कलाकारांना अजिबात आवडलं नाही. "तिने शुभांगीचा अपमान केला," अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांसोबतच टीव्ही कलाकारांनीही तिला चांगलंच ट्रोल केलं. मात्र, या प्रकरणावरून आता शिल्पाने मीडियालाच टार्गेट केलं आहे.
advertisement
शिल्पाने मीडियावरच फोडलं खापर
ट्रोलिंगचा हा वाढता पारा पाहून शिल्पा गप्प बसणारी नव्हतीच. शिल्पाने आता तिच्या स्वतःच्या वक्तव्यावर सारवासारव करत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्य म्हणजे तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचं खापर तिने मीडियावर फोडलं आहे. शिल्पाने या सर्व प्रकरणासाठी थेट मीडियाला जबाबदार धरत म्हटलंय, "माझं विधान मीडियाने चुकीच्या पद्धतीनं तोडून-मोडून लोकांसमोर मांडलं आहे. मी शुभांगीबद्दल काहीही नकारात्मक बोलले नाही. मी नेहमीच तिला एक उत्तम अभिनेत्री मानत आले आहे. जे लोक माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवत आहेत." इतकंच नाही, तर शिल्पाने मीडियावर "भीक मागायची वेळ येईल!" असंही भाष्य केलं.
शुभांगीचं शांत पण सडेतोड उत्तर
हा वाद जेव्हा शुभांगी अत्रेपर्यंत पोहोचला, तेव्हा तिने अतिशय समजूतदारपणे आणि प्रोफेशनल भाषेत आपली बाजू मांडली. शुभांगी म्हणाली, "मी कोणाचीही नक्कल करत नव्हते. मला दिलेलं 'अंगुरी भाभी'चं पात्र मी प्रामाणिकपणे निभावत होते. जर पात्राची भाषा भोजपुरी असेल, तर मला तीच बोलावी लागेल. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही कोणाची कॉपी करत नाही." शुभांगीच्या या शांत प्रतिसादाचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
पुन्हा एकदा 'भाभी जी घर पर है'चा कल्ला!
सर्व वाद-विवाद बाजूला ठेवले, तर आता पुन्हा एकदा शिल्पा शिंदेला त्याच जुन्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. १० वर्षांनंतर शिल्पाची ही सेकंड इनिंग मालिकेला टीआरपीच्या शिखरावर नेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
