जिनिलीया देशमुख झाली फिदा!
ही खास व्यक्ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री जिनिलीया देशमुख आहे. प्रिया आणि उमेशचा सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. अशातच जिनिलीयाने ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि तिने प्रिया बापटच्या गाण्याचं खूप कौतुक केलं आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
advertisement
जिनिलीयाने चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या मराठी सिनेमासाठी तुमचं खूप-खूप अभिनंदन! तुमच्या सिनेमाला सध्या खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि हे पाहून मला खूपच आनंद झालाय.”
पण, जिनिलीया इथेच थांबली नाही. तिने पुढे लिहिलं, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रिया तू गायलेलं गाणं किती सुंदर आहे, मला खूप आवडलं. तुम्ही सुद्धा हा सिनेमा नक्की पाहा.” जिनिलीयाने प्रिया आणि उमेशला टॅग करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रिया-उमेशने मानले आभार!
जिनिलीयाने कौतुक केलेल्या या गाण्याचं नाव ‘पण या ईगोचं करायचं काय…’ असं आहे. हे गाणं प्रियाने ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासोबत गायलं आहे. जिनिलीयाची ही पोस्ट पाहून प्रिया आणि उमेश दोघेही खूप आनंदी झाले. त्यांनी जिनिलीयाला खास आभार मानले आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे खूप आनंद झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात प्रिया-उमेश सोबत निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत.