TRENDING:

बालपणीच वडिलांचं निधन, दिव्याच्या उजेडात केला अभ्यास, आज तिचा बॉलिवूडमध्ये डंका, गावातल्या तरुणीचं मोठं यश!!

Last Updated:

बालपणी आपल्या वडिलांच्या निधनानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, शिक्षणाची ओढ तिच्या मनात निर्माण झाल्याने तिने या सर्वांवर मात केली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनमोहन सेजू, प्रतिनिधी
सोहनी कुमारी
सोहनी कुमारी
advertisement

बाडमेर : आयुष्यात काही करायची जिद्द असेल तर कितीही संकटे आली तर व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करतो. आज एका तरुणीची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. जिने अंत्यत संघर्ष केली. दिव्याच्या प्रकाशात तिने अभ्यास केला आणि आज या तरुणीने बॉलिवूडमध्ये चांगलेच नाव कमावले आहे.

सोहनी कुमारी असे या तरुणीचे नाव आहे. बालपणीच तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिची आई गवरी देवी यांनी सोहनी, तिच्या दोन बहिणी आणि दोन भाऊंचे पालनपोषण केले. सोहनी कुमारी हिने बारावीच्या शिक्षणानंतर मुंबईत जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर करायची इच्छा व्यक्त केली.

advertisement

राजस्थानच्या मोखावा या एका छोट्या गावातून येणारी सोहिनी कुमारीला बालपणी आपल्या वडिलांच्या निधनानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, शिक्षणाची ओढ तिच्या मनात निर्माण झाल्याने तिने या सर्वांवर मात केली.

सावधान! Heat strokeचा धोका वाढलाय, डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्यावी काळजी

शिक्षणादरम्यान, मुंबई जाऊन काहीतरी करुन कुटुंबीयांच्या स्वप्नांना पूर्ण करायचं, आपली आर्थिक परिस्थितीवर मात करायची असा निर्धार तिने केला होता. यासाठी ती मुंबईला गेली. मुंबईला आल्यावर तिने एका लहान थिएटरपासून सुरूवात केली. तसेच अनेक मालिकांमध्ये काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सोहिनी सांगते की, गावातून थेट मुंबईला आली आणि 9 वर्षांच्या अथक संघर्षानंतर चित्रपट निर्माता बनण्यात यशस्वी झाली.

advertisement

फक्त 2 हजार लोकसंख्येच्या मोखावा गावातून मुंबईला येणारी तरुणी सोहिनी हिला खूप संघर्ष करावा लागला. नुकतेच सोहिनीने एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘आखिर पलायन कब तक’ नावाचा चित्रपट तयार करण्यासाठी सोहिनी हिने 8 कोटी रुपये खर्च केले आहे. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट धर्माच्या नावाखाली लोकांच्या जमिनी बळकावण्याच्या ज्वलंत समस्येवर हा चित्रपट आधारित होता.

advertisement

शनी करेल आता संगळं चांगलं, या राशींचं नशीब पालटणार, घरी येईल पैसाच पैसा!

चित्रपटाबाबत ती म्हणाली की, मी राजस्थानच्या बाडमेर येथून येथे आणि एका समुदायाने दुसऱ्याची जमीन ताब्यात घेतली आणि त्यामुळे दुसऱ्या लोकांना पलायन करावे लागले, मी अशा अनेक घटना पाहिल्या आहेत. ही बाब लक्षात ठेवून वास्तविकतेला आधार बनवून मी हा चित्रपट तयार केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सोहनी कुमारी आणि अलका चौधरी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शनक मुकुल विक्रम आहेत. एका सत्य घटनेवर आधारित असलेला ‘आखिर पलायन कब तक’ हा चित्रपट दोन समुदायांमधील धार्मिक कट्टरतेमुळे होणारे खून, पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेला पोलीस निरीक्षक, हरवलेले कुटुंब आणि त्याचे चार सदस्य आणि इतर अनेक रोमांचक परिस्थितींवर तयार करण्यात आला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
बालपणीच वडिलांचं निधन, दिव्याच्या उजेडात केला अभ्यास, आज तिचा बॉलिवूडमध्ये डंका, गावातल्या तरुणीचं मोठं यश!!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल