सावधान! Heat strokeचा धोका वाढलाय, डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्यावी काळजी

Last Updated:

उकाडा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दुपारच्या उन्हात जरा चाललं तरी धाप लागते, जीव अगदी घाबराघुबरा होतो. अशात स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणं हेच महत्त्वाचं आहे.

अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 35-40 अंशांच्या पार गेल्याने हीट स्ट्रोकचा धोका वाढलाय.
अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 35-40 अंशांच्या पार गेल्याने हीट स्ट्रोकचा धोका वाढलाय.
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
आग्रा : राज्याच्या काही भागांमध्ये दिवसाआड अवकाळी पावसाचा इशारा दिला जातोय. वादळी वाऱ्यासह पाऊस काही भागांमध्ये हजेरीसुद्धा लावतोय. वातावरणात तेवढ्यापुरता गारवा निर्माण होतो खरा, पण नंतर मात्र परिस्थिती जैसे थे राहतेय. उकाडा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दुपारच्या उन्हात जरा चाललं तरी धाप लागते, जीव अगदी घाबराघुबरा होतो. अशात स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणं हेच महत्त्वाचं आहे.
advertisement
सध्या सूर्य जणू आग ओकतोय. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 35-40 अंशांच्या पार गेल्याने हीट स्ट्रोकचा धोका वाढलाय. क्षणोक्षणी अंग घामाघूम होत असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं. परिणामी शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होतेय. शरिरातलं तापमान वाढल्यास व्यक्ती जागच्या जागी बेशुद्धही पडू शकते, जे अत्यंत धोकादायक आहे.
advertisement
डॉ. मृदुल चतुर्वेदी सांगतात की, आपल्या आजूबाजूचं तापमान 40 अंश डिग्री सेल्सियसच्या पार असेल तर हिट स्ट्रोकचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी सर्वात महत्त्वाचं असतं ते शरिरात गारवा निर्माण करणं. त्यासाठी पंखा किंवा कूलरच्या जवळ राहावं. थंड कापडाने अंग पुसावं. त्यामुळे शरिरातलं तापमान कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांना वाढतं तापमान अजिबात सहन होत नाही. त्यांनी जास्तीत जास्त शीतपेय प्यावी. आंब्याचं पन्ह प्यायलं तर उत्तम. शिवाय आपण ताक आणि लिंबूपाणीसुद्धा पिऊ शकता. कलिंगड, खरबूज, काकडी भरपूर प्रमाणात खावी. त्यामुळे शरिरातली पाण्याची पातळी भरून निघते. उन्हात घराबाहेर पडताना सूती कपडे परिधान करावे. सोबत छत्री ठेवावी. दिवसभरातून जवळपास 8 लिटर पाणी पोटात जायलाच हवं. लहान मुलांना शक्यतो दुपारी घराबाहेर पडू देऊ नये.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
सावधान! Heat strokeचा धोका वाढलाय, डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्यावी काळजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement