टरबूज की खरबूज? दोन्ही पाणीदार, पण उन्हाळ्यात आरोग्यासाठी सर्वोत्तम काय?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आहारात हंगामी फळांचा समावेश असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात तर बाजारात विविध रंगीबेरंगी फळं पाहायला मिळतात. त्यातूनही सर्वाधिक मागणी मिळते ती कलिंगड आणि खरबुजाला. कलिंगडाला टरबूजही म्हणतात. (ऋषभ चौरसिया, प्रतिनिधी / लखनऊ)
advertisement
लखनऊ राजकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राचार्य माखन लाल सांगतात, उन्हाळ्यात शरीर प्रचंड घामाघूम होतं, त्यामुळे शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. हीच कमी भरून काढण्यासाठी टरबूज आणि खरबूज ही दोन्ही फळं <a href="https://news18marathi.com/lifestyle/which-is-better-chicken-or-mutton-which-non-veg-food-is-more-beneficial-to-the-body-mhpl-1170513.html">फायदेशीर</a> ठरतात. या दोन्ही फळांमध्ये पाण्याचं प्रमाण 90 टक्के असतं. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.
advertisement
टरबूज आणि खरबुजात पाण्याप्रमाणेच <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/eating-banana-and-milk-together-know-benefits-or-loss-what-experts-said-l18w-mhkd-1170374.html">व्हिटॅमिन्स</a>चं प्रमाणही भरपूर असतं. टरबुजात व्हिटॅमिन ए, बी1 आणि बी5 असतं, तर खरबुजात व्हिटॅमिन सी आणि बी6 असतं.
advertisement
advertisement
विशेष म्हणजे या दोन्ही फळांमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यांमध्ये असलेल्या फायबरच्या चांगल्या प्रमाणामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं, म्हणजेच सतत भूक लागत नाही. परिणामी ओव्हरइटिंग न झाल्यानं वजन कमी होण्यास मदत मिळते. म्हणूनच या दोन्ही फळांपैकी उन्हाळ्यात <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/home-remedies-to-get-rid-of-spectacles-mhij-1169660.html">आरोग्यासाठी जास्त फायदेशीर</a> कोणतं फळ हे सांगता येत नाही.


