80 वर्षातही दात हिऱ्यासारखे चमकतील! डॉक्टरांनी सांगितलं जबरदस्त Solution
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पूर्वी साठीत दात किडायला सुरुवात व्हायची, आता तर विशीतच दातांना कीड लागते. दातांवर पिवळा थर जमा होण्याची समस्या तर आता अगदी सामान्य झालीये. याचं मुख्य कारण आहे दातांची योग्य काळजी न घेणं. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी / हजारीबाग)
दात पिवळे पडणं, जास्त गरम किंवा थंड खाल्ल्यास दातांमध्ये वेदना होणं, कमी वयात दात पडणं, हिरड्यांमधून रक्त येणं, तोंडाचा घाण वास येणं, इत्यादी सर्व समस्यांवर तुम्ही काही चांगल्या सवयींनी मात करू शकता. आपल्याला जास्त काही करायचं नाहीये फक्त आजीबाईच्या बटव्यातले रामबाण <a href="https://news18marathi.com/lifestyle/how-to-wash-hair-without-water-hair-cleaning-tips-lifestyle-hack-summer-tips-mhpl-gh-1170715.html">उपाय</a> वापरायचे आहेत.
advertisement
डॉक्टर मकरंद कुमार पांडे सांगतात की, दातांचे रोग आता सर्वसामान्य झाले असले तरी हळूहळू आपण त्यांपासून सुटका मिळवू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वेळापत्रक कितीही व्यस्त असलं तरी वेळात वेळ काढून व्यवस्थित ब्रश करायचं. पाणी, अन्नपदार्थ तोंडातून आपल्या पोटात जातात, त्यामुळे तोंड स्वच्छ असायलाच हवं.
advertisement
advertisement
advertisement
बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्टमध्ये अनेक केमिकलचा वापर केलेला असतो. त्यामुळे घरात हळद, मोहोरीचं तेल आणि मीठ समप्रमाणात मिसळून पेस्ट तयार करून तिने दात घासण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे दात वर्षानुवर्षे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/watermelon-or-muskmelon-which-fruit-is-best-for-summer-l18w-mhij-1170934.html">निरोगी</a> आणि भक्कम राहतात.


