गोविंदा आणि सुनिता वेगळे होणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता सुनिता अहुजा यांनी स्वतः पुढे येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना सुनिता म्हणाल्या, “आमचे नातं चांगले आहे. गोविंदा आणि मी एकत्रच आहोत. आमच्यात सगळे ठीक आहे.”
advertisement
ट्रोलिंगवर काय म्हणाल्या सुनिता अहुजा
सुनिता यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही परखडपणे उत्तर दिले. “लोक काय बोलतात, काय ट्रोल करतात याचा काही फरक पडत नाही. जोपर्यंत माझ्या किंवा गोविंदाच्या तोंडून काही ऐकत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.
त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांबद्दलही खुलेपणाने सांगितले. मुलगा यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तो याआधी ‘धूम’, ‘बागी’ आणि ‘किक 2’ या मोठ्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. सुनिता म्हणाल्या, “मी यशला नेहमी सांगते की तू गोविंदाच्या नावावर नको जगू, स्वतःची ओळख तयार कर.” तिची मुलगी टीना सुद्धा स्वतःचा मार्ग शोधत आहे. सुनिता म्हणाल्या, “टीना सध्या इतर कामांमध्ये बिझी आहे. तीही इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण करेल.”
दरम्यान, गोविंदाचा मोठा चाहता वर्ग असून त्याच्या कामाविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याच्या फॅमिलीविषयी काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात.