अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनं हीरामंडीमध्ये बिब्बो जानची भुमिका साकारली आहे. 'सैयां हटो जाओ' या गाण्यावर अदिती मुजरा करताना दिसते. या गाण्यात अदिती कॅमेऱ्याकडे पाठ कडून वॉक करताना दिसतेय. याला गजगामिनी वॉक असं म्हणतात. बिब्बो जानच्या या वॉकवर चाहते फिदा झालेत. याआधीही बॉलिवूडमध्ये मधुबाला आणि माधुरी दीक्षित यांनी गजगामिनी चाल केली आहे. पण अदिती राव त्यांच्यात वरचढ ठरली आहे.
advertisement
( हेही वाचा - अक्षयाच्या बर्थडेसाठी हार्दीकचं खास सरप्राइज, राणाच्या रिअल लाइफ बायकोचं वय माहितीये? )
मिळालेल्या माहितीनुसार,संस्कृतमध्ये गजगामिनीचा अर्थ हत्तीची चाल. म्हणजेच हत्ती किंवा हत्तीसारखे चालणे, हलणे आणि शांतपणे डोलत चालणं. कथ्थक या भारतीय शास्त्रीय नृत्यात गजगामिनी चालीला विशेष महत्त्व आहे. कथ्थक नृत्य शिकणाऱ्या प्रत्येकाला गजगामिनीची चाल शिकवली जाते. यालाच गजगामिनी गत देखील म्हणतात.
अभिनेत्री अदिती राव हैदरी ही कथ्थक नृत्यांगणा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तिला आधीपासूनच जाणं आहे. त्यामुळे अदितीनं गजगामिनीची चाल अत्यंत सुंदरपणे केलेली पाहायला मिळते.
अदिती राव हैदरीच्या आधी अभिनेत्री मधुबाला हिनं मुघल ए आजम सिनेमातील मोहे पनघट पे या गाण्यात गजगामिनी चाल केली होती. अदिती राव हैदरी आणि मधुबालाच्या गजगामिनी चालीची तुलना सोशल मीडियावर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री माधुरी दीक्षितनं देखील एका गाण्यात गजगामिनी वॉक केल्याचं पाहायला मिळतं.