शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा देखील स्पॉट झाले होते. मात्र, सुहाना दुसऱ्या कारमध्ये बसून घराकडे निघाली. शाहरुखच्या चाहत्यांनी 'X' वर काही व्हिडिओ शेअर केले आहेत.
शाहरुख खान दरवर्षी आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबासोबत घालवतो. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी शाहरुख कुटुंब आणि त्याच्या मित्रांना घेऊन अलिबाग येथील फार्म हाऊसवर गेला होता. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत आर्यन खान दिसला नाही.
advertisement
दरम्यान, कुत्र्याला हातातून घेऊन बोटीत जात असताना शाहरुखसोबत बोटीत एक घटना घडली आहे. बोटीत बसताना शाहरुखचं डोकं बोटीच्या दाराला आपटलं. मात्र याकडे लक्ष न देता शाहरुख बोटीत शिरला.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर “पठाण” आणि “जवान”च्या यशानंतर शाहरुख खान मुलगी सुहानासोबत सुजॉय घोषच्या “किंग” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख या चित्रपटात सुहानाच्या पात्राला ट्रेनिंग देताना दिसणार आहे. दुसरीकडे आर्यन खानही दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आर्यनने “स्टारडम” नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे ज्याचा प्रीमियर थिएटरवर नाही तर नेटफ्लिक्सवर होईल.