21 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनं सगळेच हादरले आहेत. इमानी डिया स्मिथ असं हॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे. 'द लायन किंग', 'ब्रॉडवे' सारख्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये तिनं काम केलं आहे. न्यू जर्सीमध्ये तिची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे.
advertisement
न्यू जर्सीच्या काउंटी ऑफिसकडून आलेल्या माहितीत असं सांगण्यात आलं आहे की 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.18 मिनिटांनी आमच्या अधिकाऱ्यांना 911 कॉलवर या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ अभिनेत्रीच्या एवेन्यू येथील घरी पोहोचले. अभिनेत्री मृतावस्थेत आढळली. तिच्या शरिरावर असंख्य चाकूचे वार पाहायला मिळाले. अभिनेत्री स्मिथला तात्काळ रॉबर्ट वुड जॉनसन युनिवर्सिटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.डॉक्टरांनी तिला तिथे मृत घोषित केलं.
पीपुलच्या माहितीनुसार, स्मिथचा 35 वर्षी बॉयफ्रेंड जॉर्डन डी. जॅक्सन स्मॉलवर अभिनेत्रीच्या हत्येचा संशय असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.. जॉर्डन डी जैक्सन स्मॉल आणि स्मिथ एकमेकांना ओळखत होते. हत्येसोबतच त्याच्यावर आणखी बरेच आरोप करण्यात आले आहेत.
एडिसन पोलिसांनी जॉर्डनला अटक केली आहे. त्याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डर, सेकेंड डिग्रीमध्ये मुलांची सुरक्षा धोक्यात टाकणे, थर्ड डिग्रीमध्ये अवैधरित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत अभिनेत्री इमानी स्मिथच्या मृत्यूपश्चात तिचा 3 वर्षांचा मुलगा, आई-वडील, काकी आणि दोन लहान भाऊ - बहिण आहेत.
