रोशन कुटुंबातील हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र याच लग्नातील एक व्हिडीओ सध्या सर्वाधिक चर्चेत आला असून त्यात राकेश रोशन आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.
advertisement
लग्नानंतर नव्या नवरा-नवरी आशीर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी येतात. त्यांना शगुन म्हणून पैसे दिले जातात. ईशानच्या लग्नात तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती. त्यांनी दारात उभ्या असलेल्या नवी नवरी ऐश्वर्या आणि नवरा ईशान यांना थांबवलं होतं. त्यानंतर राकेश रोशन तिथे आले आणि तृतीयपंथीयांशी बोलत होते. मात्र ही चर्चा काही वेळातच वादात रूपांतरित झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोशन कुटुंबाकडून शगुन देण्यात आला होता. पण तृतीयपंथीय शगुनाच्या रकमेवर समाधानी नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांनी आणखी शगुनाची मागणी केली आणि त्यावर राकेश रोशन भडकले असं म्हटलं जात आहे. राकेश रोशन यांच्या बॉडीलँग्नेजमधूनही ते संतापल्याचं दिसत आहे.
दरम्यान वाद वाढताना पाहून ईशानचे वडील आणि राकेश रोशन यांचे भाऊ राजेश रोशनही तिथे आले. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. याच वेळी राजेश रोशन आणि कुटुंबीयांनी पापाराझींना पोज देत वातावरण थोडं हलक फुलक करण्याचा प्रयत्न केला.
