TRENDING:

Rashmika-Vijay Wedding: ठरलं बरं का! अखेर रश्मिका मंदानाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं लग्न, शेअर केला क्यूट हॅशटॅग

Last Updated:

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: रश्मिकाने स्वतः या लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे, या जोडीने त्यांच्या लग्नाला एक अतिशय खास नाव दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या एका बातमीची संपूर्ण भारत वाट पाहत होता, ती अखेर समोर आली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना आणि 'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडा आता खऱ्या अर्थाने एकमेकांचे होणार आहेत. सोशल मीडियावर रंगणाऱ्या हजारो चर्चांना पूर्णविराम देत, रश्मिकाने स्वतः या लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे, या जोडीने त्यांच्या लग्नाला एक अतिशय खास नाव दिलं आहे, 'विरोष की शादी' (VIROSH)!
News18
News18
advertisement

विजय आणि रश्मिकाने आपल्या एका खास संदेशात असं म्हटलं आहे की, 'विरोष' हे नाव कोणत्याही वेडिंग प्लॅनरने किंवा घरच्या परंपरेने दिलेलं नाही, तर ते त्यांच्या लाडक्या चाहत्यांनी दिलेलं आहे. विजय (VI) आणि रश्मिका (ROSH) यांना एकत्र पाहून चाहत्यांनी हे नाव तयार केलं होतं. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सोहळ्याला चाहत्यांनी दिलेल्या नावाशी जोडून, या जोडीने हे सिद्ध केलंय की त्यांचे पाठीराखे केवळ प्रेक्षक नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत.

advertisement

चाहत्यांसाठी रश्मिकाचा खास मेसेज

रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलंय, "आमच्या लाडक्या चाहत्यांनो, आम्ही काहीही प्लॅन करण्याआधीपासूनच तुम्ही आमच्या सोबत होतात. इतक्या प्रेमाने तुम्ही आम्हाला एक नाव दिलंत, 'विरोष'. म्हणूनच आज, आम्ही आमचं हे नातं तुमच्या सन्मानार्थ याच नावाने ओळखणार आहोत, 'विरोष की शादी'. तुम्ही दिलेल्या या अफाट प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही नेहमीच आमच्या सोबत असाल. खूप खूप प्रेम!"

advertisement

BBM6: 'मला वेड लागले प्रेमाचे...', ‘भाऊचा धक्का’वर रोमँटिक झाले रुचिता-विशाल, रितेश भाऊ बघतच राहिला, VIDEO

रश्मिका आणि विजयची ही लव्हस्टोरी संघर्षातून आणि सावरण्यातून फुलली आहे. ३ जुलै २०१७ रोजी रश्मिकाचा अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला होता, मात्र सप्टेंबर २०१८ मध्ये काही कारणास्तव हे नातं तुटलं. त्यानंतर रश्मिकाच्या आयुष्यात विजयची एंट्री झाली. २०१८ पासून हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांतून त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री सुपरहिट ठरली आणि आता हीच केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही कायमची स्थिरावणार आहे. लवकरच हे दोघं 'रणबाली' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika-Vijay Wedding: ठरलं बरं का! अखेर रश्मिका मंदानाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं लग्न, शेअर केला क्यूट हॅशटॅग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल