advertisement

BBM6: 'मला वेड लागले प्रेमाचे...', ‘भाऊचा धक्का’वर रोमँटिक झाले रुचिता-विशाल, रितेश भाऊ बघतच राहिला, VIDEO

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: विशाल आणि रुचिता यांनी 'का जीव तोळा तोळा' या गाण्यावर असा काही परफॉर्मन्स दिला की घरचे सदस्य अवाक झाले.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या प्रेम आणि वादाचा असा काही मसाला शिजतोय की, प्रेक्षकांचाही डोळा पडद्यावरून हटत नाहीये. एकीकडे विशाल आणि रुचिता यांच्यात प्रेमाचे वारे वाहत असतानाच, आता या 'लव्हस्टोरी'मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत हिने एन्ट्री घेतली आहे. राखीने त्यांच्या प्रेमाला 'लव्ह लपाटा' म्हटल्यामुळे रुचिताचा पारा भडकला असून, तिने चक्क रितेश देशमुख समोर आणि नंतरही राखीला चांगलंच धारेवर धरलं आहे.

'भाऊच्या धक्क्यावर' रोमँटिक डान्स

आजचा 'भाऊचा धक्का' खऱ्या अर्थाने गाजला तो विशाल आणि रुचिताच्या केमिस्ट्रीमुळे. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली रुचिता आणि पांढऱ्या सूटमध्ये डॅशिंग दिसणारा विशाल यांनी 'का जीव तोळा तोळा' या गाण्यावर असा काही परफॉर्मन्स दिला की घरचे सदस्य अवाक झाले. त्यांच्यातील ही जवळीक पाहून खुद्द रितेशनेही आश्चर्याने तोंडात बोटं घातली. विशालने आधीच स्पष्ट केलंय की, "आमच्यात वयाचं अंतर असलं तरी मला फरक पडत नाही, आम्ही ते बघून घेऊ."
advertisement
advertisement
पण सध्या गोड प्रेमकथेत कडू चव येतेय ती राखी सावंतमुळे. कालच्या एपिसोडमध्ये रितेशने जेव्हा राखीला तिच्या अनुभवावरून खेळाबद्दल विचारलं, तेव्हा रुचिता मध्येच म्हणाली की, "मुद्दे मिळत नसल्यामुळे राखी काहीही खोटं नाटक क्रिएट करतेय." यावर राखीने डिवचत म्हटलं, "अरे तुम्ही जे तिथे बसून 'लव्ह लपाटा' करता, त्याचं काय?
हे ऐकताच रुचिताची सटकली! तिने राखीला झापत म्हटलं, "राखी, तुला शेवटचं सांगतेय, माझ्या पर्सनल आयुष्यात लक्ष देऊ नकोस. तू राखी सावंत आहेस ना? मग तशीच राहा. माझ्या मागे मागे शेपटीसारखं हिंडणं बंद कर. तुला नवीन लोक आणि नवीन मुद्दे मिळत नसतील, तर शोध, पण माझं नाव घेऊ नकोस!"
advertisement

रुचिताला राखीचं सडेतोड उत्तर

नेहमीप्रमाणे राखीनेही शांत राहिली नाही. सुरुवातीला रुचिताचं बोलणं ऐकून घेतल्यावर ती उपरोधिकपणे म्हणाली, "काय झालं? शॉक लागला का? की उंदीर चावला?" रुचिताने तिला लिमिटमध्ये राहण्याचा सल्ला दिल्यावर राखी कडाडली, "हे काही पर्सनल नाहीये. मी या घरात राहते, माझे डोळे जे बघतात आणि जे बघणार, ते मी बोलणारच! या घरात जे काही होणार, त्यावर मी माझं मत मांडणार."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6: 'मला वेड लागले प्रेमाचे...', ‘भाऊचा धक्का’वर रोमँटिक झाले रुचिता-विशाल, रितेश भाऊ बघतच राहिला, VIDEO
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement