'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सुपरहिट चित्रपटांनंतर आता चाहते या फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट ‘दुल्हनिया 3’ लवकरच रिलीज होणार असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या चित्रपटाविषयी एक नवी अपडेट समोर आली आहे. या आगामी चित्रपटात वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी दिसणार नसल्याची बातमी समोर आली आहे. या आगामी चित्रपटात आलियाची जागा जान्हवी कपूर घेणार असल्याची बातमी आहे. करण जोहर या आगामी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
advertisement
बिग बॉसच्या या स्पर्धकाला भोगावी लागणार त्याच्या कृत्याची शिक्षा; हे ऐकून चाहत्यांना बसेल मोठा धक्का
पीपिंगमूनच्या बातमीनुसार, वरुण आणि आलिया भट्टच्या प्रसिद्ध फ्रेंचायझीच्या पुढच्या चित्रपटात जान्हवी आलियाच्या जागी असेल. या चित्रपटात जान्हवी पुन्हा एकदा वरुणसोबत रोमान्स करणार आहे. दोघेही लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. आलियाने या चित्रपटातून बाहेर पडण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आलिया अन्य कोणत्या तरी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने तिने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आलिया किंवा फिल्म मेकर टीमकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वरुण-जान्हवीची जोडी बवाल या चित्रपटात दिसली होती. मात्र, त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नव्हती. त्यांचा हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता त्यामुळे 'दुल्हनिया ३' मध्ये या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची किती पसंती मिळणार , प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा आवडेल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, शशांक खेतान 'दुल्हनिया 3' दिग्दर्शित करणार आहे. रिपोर्टनुसार, "दुल्हनिया 3 मध्ये वेगळी कथा आणि पात्रे असतील आणि ती कोणत्याही प्रकारे मागील भागांशी जोडली जाणार नाही. याआधी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनियाच्या कथा देखील एकमेकांपासून वेगळ्या होत्या. प्री-प्रॉडक्शन सुरू झाले आहे आणि येत्या काही महिन्यांत शूटिंग सुरू होईल. मात्र, धर्मा प्रॉडक्शन आणि करण जोहरने या अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवन सध्या थेरी विथ अॅटलीच्या रिमेकमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो सिटाडेल इंडियामध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. तर जान्हवी कपूरकडे सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफसोबत चित्रपट आहेत. ज्युनियर एनटीआर सोबत देवरा देखील आहे. हा चित्रपट जान्हवीचा तेलुगू चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट असेल.
