बिग बॉसच्या या स्पर्धकाला भोगावी लागणार त्याच्या कृत्याची शिक्षा; हे ऐकून चाहत्यांना बसेल मोठा धक्का

Last Updated:

सलमान खानच्या बिग बॉस 17 या शोमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. सगळीकडे या शोचीच चर्चा आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात असं काही घडलं की मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींपासून सगळ्यांचं लक्ष या शोकडे वळलं.

बिग बॉस 17
बिग बॉस 17
मुंबई : सलमान खानच्या बिग बॉस 17 या शोमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. सगळीकडे या शोचीच चर्चा आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात असं काही घडलं की मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींपासून सगळ्यांचं लक्ष या शोकडे वळलं. सगळ्यांनी बिग बॉसच्या एका स्पर्धकाला सगळेजण समर्थन करताना दिसत आहेत. हा स्पर्धक आहे अभिषेक कुमार. घरात असं काही घडलं की अभिषेक कुमारच नाव तेव्हापासून चांगलंच चर्चेत आलं आहे. आता त्याच्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
नुकतेच, बिग बॉस च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला, यादरम्यान अभिषेक कुमार व समर्थ जुरैल यांच्यात जोरदार भांडण झाले. या लढतीदरम्यान अभिषेकने अनवधानाने समर्थला चापट मारली, त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. समर्थ व अभिषेकच्या भांडणादरम्यान ईशा मालवीयने अभिषेकला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर अभिषेक व ईशामध्ये नवा वाद सुरु झाला. मात्र समर्थच्या कानाखाली मारणं अभिषेकला आता महागात पडणार असल्याचं दिसत आहे.
advertisement
'25 वर्षानंतरही शालिनी तरुणच... ' 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या नव्या ट्विस्टची प्रेक्षकांनी उडवली खिल्ली
दरम्यान, अभिषेकबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, जी जाणून घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. आगामी बिग बॉस 17 वीकेंड वारमध्ये, अभिषेक कुमारला घरातील दुसर्‍या सदस्यावर, समर्थवर हात उचलण्याचा फटका सहन करावा लागू शकतो. शो दरम्यान समर्थ जुरेलला कानाखाली मारून अभिषेकने बिग बॉसचा सर्वात मोठा नियम मोडला आहे, ज्यामुळे आता शोचे निर्माते अभिषेक कुमारवर मोठी कारवाई करू शकतात.
advertisement
त्यामुळे आगामी वीकेंड का वार एपिसोडमध्ये अभिषेकलाही घराबाहेर काढले जाऊ शकते असं बोललं जातंय. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा देता आलेला नाही. पण जर खरंच असं घडलं तर बिग बॉस 17 च्या चाहत्यांना आणि अभिषेक कुमारच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.
अलीकडेच, सलमान खान शो बिग बॉस 17 दरम्यान, नेहमीप्रमाणे अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्यात खूप गोंधळ उडाला. समर्थ जुरेलही या दोघांमध्ये आले आणि त्यांनी अभिषेकला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. प्रकरण इतके वाढले की अभिषेक कुमारचा संयम सुटला आणि समर्थला जोरदार चापट मारली. आता याचाच फटका त्याला बसू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉसच्या या स्पर्धकाला भोगावी लागणार त्याच्या कृत्याची शिक्षा; हे ऐकून चाहत्यांना बसेल मोठा धक्का
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement