TRENDING:

एक एक सीन अंगावर काटा आणणारा, अनिता दातेचा भनायक अवतार; 2.8 सेकंदाचा व्हिडीओ पाहा म्हणजे सगळं कळेल

Last Updated:

Jaran Trailer : ट्रेलरमधील एक एक सीन अंगावर काटा आणणारा ठरत आहे. विशेषतः अभिनेत्री अनिता दातेचा भयावह अवतार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहा मग तुम्हालाच कळेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जारण या आगामी मराठी चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरने  प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. याआधी आलेल्या टिझरमुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता ट्रेलरमधील एक एक सीन अंगावर काटा आणणारा ठरत आहे. विशेषतः अभिनेत्री अनिता दातेचा भयावह अवतार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
News18
News18
advertisement

राधाच्या आयुष्यातील रहस्य ट्रेलरमध्ये उलगडते

ट्रेलरमध्ये विवाहित राधा जेव्हा एका जुन्या वाड्यात पाऊल ठेवते त्याक्षणीच अघोरी आणि अनाकलनीय घटना सुरू होतात. तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव, वाड्यातील रहस्यमय गोष्टी आणि अनिता दातेचा मंत्रोच्चार करतानाचा अवतार अंगावर काटा आणणारा आहे. या ट्रेलरवरून स्पष्ट होते की, राधाचा या वाड्याशी काही भूतकाळातील संबंध आहे. तिच्या बालपणात झालेल्या 'जारण' या अघोरी प्रकाराचा परिणाम आजही तिच्या आयुष्यावर होत आहे का असा प्रश्न ट्रेलर उभा करतो.

advertisement

( Psychological Thriller Series: 8 एपिसोडची सायकॉलॉजिकल थ्रिलर सिरीज, ओटीटीवर घातला धुमाकूळ, बघायला बसल्यावर शेवटपर्यंत उठणार नाही )

अनिस बाझमींचे मराठीत पदार्पण

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनिस बाझमी यांनी ‘जारण’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले आहे. ते म्हणाले, "या चित्रपटाचा भाग होणं हे माझं भाग्य आहे. अमृता सुभाषमुळे मी या प्रोजेक्टशी जोडलो गेलो. चित्रपट पाहिल्यावर मी सुन्न झालो. कथा, दिग्दर्शन, अभिनय सगळंच अप्रतिम आहे. हा चित्रपट खरंच पॅन इंडिया दर्जाचा आहे."

advertisement

दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते यांची प्रतिक्रिया

दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणाले, "जारण हा फक्त भीतीदायक नसून, मानवी भावना आणि अंधश्रद्धेच्या परिणामांची खोल मांडणी करणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये भयानक दृश्यं असली तरी त्यामागे एक भावनिक कहाणी आहे. अनिता दाते आणि अमृता सुभाष यांनी जबरदस्त अभिनय केला आहे."

advertisement

कधी रिलीज होणार जारण?

जारण चित्रपट 5 जून 2025रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमृता सुभाष, अनिता दाते, किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमधील केवळ 2.8 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. विशेषतः अनिता दातेचा मंत्रोच्चार करतानाचा भयानक लूक पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे येत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
एक एक सीन अंगावर काटा आणणारा, अनिता दातेचा भनायक अवतार; 2.8 सेकंदाचा व्हिडीओ पाहा म्हणजे सगळं कळेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल