नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी आयोजित कार्यक्रमाला जया बच्चन उपस्थित होत्या. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जया बच्चन यांना हे अजिबात पसंत पडले नाही. त्यांनी त्या व्यक्तीला हाताने ढकलले आणि "क्या कर रहे हैं आप?" असे रागाने म्हटले.
जया की रेखा, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित
advertisement
ही घटना तेथील उपस्थितांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना जया बच्चन यांच्या वारंवार दिसणाऱ्या चिडचिडेपणावर टीका केली, तर काहींनी त्यांचे समर्थन करत म्हटले की, सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक जागेचा (personal space) आदर करणे आवश्यक आहे.
जया बच्चन या याआधीही पत्रकारांवर आणि चाहत्यांवर राग काढल्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच संसदेतही त्यांनी माध्यमांविरोधात कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
