'धुरंदर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिससह आता ओटीटीवरही चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची क्रेझ फक्त भारतातच नाही तर, पाकिस्तानातही पाहायला मिळत आहे. नंबर 1 वर ट्रेंडिंगला असतानाच 'धुरंदर: द रिव्हेंज'चा टीझर रिलीज झाला आहे. दरम्यान, 'धुरंदर' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 जानेवारी रोजी रिलीज झालेला होता. पण आता 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 'जिओ हॉटस्टार'वर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स 'जिओ हॉटस्टार'ला विकले आहेत. अलीकडेच टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहेत. ज्यावर निर्मात्यांकडून 'जिओ हॉटस्टार'चा लोगो लावण्यात आला आहे.
advertisement
'धुरंदर: द रिव्हेंज'च्या टीझर विषयी सांगायचे तर, 'ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी' अशा टॅगलाईनने अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धुरंधरच्या सीक्वेलचा टीझर पोस्ट केला आहे. धुरंधरच्या सीक्वेलचं नाव धुरंधर 2 नाही तर 'धुरंधर: द रिव्हेंज' असं आहे. टीझरची सुरूवात हमजाने नाही तर, जसकीरत सिंग रंगीपासून होते. लियारीच्या युद्धासाठी त्याला तयार करण्यासाठी सुरू असलेले प्रशिक्षण आणि त्याचा बदलेला लूक सुद्धा तुम्हाला टीझरमध्ये पाहायला मिळेल. टीझरमध्ये 14 सेकंदात हमजा त्याच्या लांब केसांसह फुल्ल टशनमध्ये एन्ट्री करतो. लियारीचा राजा बनल्यानंतर आधी फक्त रहमान डकैतकडे असलेली सर्व पॉवर त्याने मिळवली असल्याचे पाहायला मिळतेय.
दरम्यान, टीझरच्या शेवटी 'उरी: द सर्जिकल'मधील फेमस डायलॉग 'ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी' तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या सोशल मीडियावर 'धुरंदर: द रिव्हेंज' आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'चे काही कनेक्शन आहे का? अशी चर्चा होत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच आपल्याला नेमकं कनेक्शन काय आहे? याचा उलगडा होईल. 'धुरंदर: द रिव्हेंज' 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटासोबत यशचा बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे दोघांमध्येही क्लॅशेस होण्याची शक्यता आहे. चित्रपटात रणवीर सिंगसह प्रमुख भूमिकेत, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन देखील आहेत. तथापि, अक्षय खन्ना भाग २ मध्ये दिसणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
