गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत त्या ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारत होत्या. त्यामुळे मालिकेच्या कलाकारांवरही दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.
advertisement
'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांनी 'पूर्णा आजी' साठी भावूक पोस्ट केल्या आहेत. अशातच मालिकेतील 'अस्मिता' म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेदेखील धक्क्यात आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत म्हटलं, 'तू आहेस ...!! माझ्या आणि वृंदा सोबत ..!! I love you and will miss you..!! माझी पूर्णाआजी ..!!!"
दरम्यान, मोनिकाने शेअर केलेल्या भावूक पोस्ट पाहून चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. सगळ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ज्योती चांदेकर यांचं निधन आज सकाळी ११ वाजता पुण्यात झालं. त्या गेल्या काही काळापासून आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, पौर्णिमा आणि तेजस्विनी, असा त्यांचा परिवार आहे.
ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली ती 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतील 'पूर्णा आजी'च्या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला एक मोठा धक्का बसला आहे.
