वडिलांच्या संपत्तीत मागितला वाटा
समायरा आणि किआन या करिश्मा कपूरच्या मुलांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, मुलांनी कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी २१ मार्च २०२५ रोजी संजय कपूर यांनी केलेली विल संशयास्पद आणि खोटी असल्याचा आरोप केला आहे.
advertisement
सावत्र आईवर गंभीर आरोप!
तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की संजय कपूर यांनी मृत्युपत्राचा उल्लेख केला नाही किंवा त्यांची सावत्र आई प्रिया कपूर किंवा इतर कोणीही त्यांना या मृत्यूपत्राबाबत कधीही माहिती दिली नाही. प्रियाच्या वर्तनावरून असे दिसून येते की कथित मृत्युपत्र तिनेच बनवले होते, असा आरोप त्यात करण्यात आला आहे.
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची आई राणी कपूर आणि दुसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यातही संपत्तीवरून वाद सुरू आहे. याच वादात आता मुलांनीही उडी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या सौतेल्या आईवर म्हणजेच प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे प्रियाचीही अडचण वाढली आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.