आनंद आणि कृतज्ञतेनं आम्ही आमच्या आयुष्याचा बेस्ट चॅप्टर सुरू करण्याच्या मार्गावर आहोत, असं म्हणत विक्की आणि कतरिना यांनी आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. दोघांनी गोड फोटो शेअर केला आहे. ज्यात कतरिनाचा क्यूट बेबी बंप दिसत आहे. विक्की कतरिनाच्या बेबी बंपला हात लावून प्रेमानं पाहत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
विक्की आणि कतरिना यांनी 9 डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. दोघांनी त्यांचं लग्न सीक्रेट ठेवलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनी दोघे आई-बाबा होणार आहेत. लग्नाप्रमाणेच कतरिनाची प्रेग्नंसीही त्यांनी सीक्रेट ठेवली होती.
अनेक महिने कतरिना लाइमलाइटपासून दूर
विक्की आणि कतरिना यांनी त्यांच्या पर्सनल लाइफ प्रायव्हेट ठेवली होती. अनेक महिन्यांपासून कतरिना कॅमेरापासून दूर होती. 'छावा' सिनेमाच्या प्रीमियरला ती विक्कीसोबत दिसली होती. त्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
या दिवशी होणार डिलिव्हरी
मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर 15 ते ऑक्टोबर 30 या काळात कतरिनाची डिलिव्हरी होणार आहे. दरम्यान विक्की आणि कतरिना यांनी गुड न्यूज शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांना थेट बाळ जन्माला आल्यानंतरच अनाऊंस करायचं होतं असं म्हटलं आहे.