सोनी वाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हर्षवर्धनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने केबीसी जिंकल्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं. इतक्या वर्षांनी शोमध्ये परतल्याचा आनंदही व्यक्त केला. हर्षवर्धन म्हणाला, "मी शो जिंकून बराच काळ लोटला आहे, पण अजूनही लोक मला 'केबीसी'चा विजेता म्हणून ओळखतात."
( थिएटरसाठी मुंबईत आले, हिंदी, साऊथमध्ये रुळले; 22 वर्षांनी सयाजी शिंदेंचं मराठी नाटकात कमबॅक )
advertisement
'केबीसी'ने नवी ओळख आणि सन्मान दिला
हर्षवर्धन पुढे म्हणाला, "25 वर्षांनंतर या मंचावर आल्यावर असं वाटतं की मी घरी परतलो आहे. हा शो माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. यामुळे मला ओळख, पैसा आणि लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळाला. इतक्या वर्षांनंतरही लोक मला आठवतात याचा मला आनंद आहे."
हर्षवर्धन यांनी लोकांना आणि स्पर्धकांना त्यांच्या अनुभवानं पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला. ज्ञान आणि शिक्षणानं त्यांच्या जीवनात कसा मोठा बदल घडवून आणला हे त्यांनी सांगितलं. शो दरम्यान, त्याचे विजयी क्षण देखील पुन्हा दाखवले गेले, ज्याने लोकांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हा विशेष भाग 20 जानेवारी रोजी प्रसारित झाला आहे.
हर्षवर्धनची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
केबीसीचा पहिला विजेता हर्षवर्धन यांची पत्नी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री. सारिका नवाथे असं तिचं नाव आहे म्हणजेच 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील आत्या. 'मोलकरीण बाई', 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'प्रेमास रंग यावे' सारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर 'मुन्नाभाई एसएससी', 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर', 'एक डाव संसाराचा', 'अजिंक्य', सारख्या मराठी सिनेमातही काम केलं आहे.