TRENDING:

तासंतास शूटिंग, मानधनाची अनिश्चितता यांचं टेन्शन मिटणार! सिने कलाकारांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल

Last Updated:

महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलाकारांसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्याची मोठी घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत. वरून लख्ख दिसणाऱ्या ग्लॅमरच्या जगामागे तासनतास चालणारं शूटिंग, मानधनाची अनिश्चितता आणि आरोग्याची हेळसांड हे वास्तव कोणापासून लपलेलं नाही. पण आता या सर्व समस्यांना पूर्णविराम देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलाकारांसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्याची मोठी घोषणा केली आहे.
News18
News18
advertisement

मंत्रालयात पार पडली महत्त्वाची बैठक

नुकतीच मंत्रालयात या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम धिल्लो यांनी विशेष उपस्थिती लावली होती. कलाकारांच्या समस्या, सेटवर होणारी कुचंबणा आणि सुरक्षेचा अभाव यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. चित्रपट क्षेत्रात काम करणारा प्रत्येक घटक, मग तो स्पॉट बॉय असो किंवा मुख्य अभिनेता, प्रत्येकाला सन्मानाने आणि कायदेशीर संरक्षणात काम करता यावं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

advertisement

नवीन लेबर कोडमध्ये काय असणार?

राज्य सरकार नवीन Labour Code अंतर्गत एका विशेष मसुद्यावर काम करत आहे. यामध्ये पुढील मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

राजपाल यादवने याआधी दोनवेळा खाल्लीय जेलची हवा, 3 महिन्याच्या तुरुंगवासात सुरू केलेलं 'हे' काम, जेलरही झालेले हैराण

शूटिंगच्या नावाखाली कलाकारांना दिवस-रात्र जुंपून घेण्याच्या प्रथेला चाप बसणार. कामाचे तास निश्चित केले जातील. कलाकारांचे मानधन किंवा कामगारांचा पगार वेळेवर मिळावा, यासाठी कडक नियम असतील. सेटवर अपघात झाल्यास किंवा आरोग्याच्या तक्रारी असल्यास विमा संरक्षण अनिवार्य असेल. हा मसुदा अंतिम करण्यापूर्वी या क्षेत्रातील अनुभवी लोक, संघटना आणि अभ्यासू घटकांकडून सूचना मागवल्या जाणार आहेत.

advertisement

कलाकारांनाही मिळणार कामगारांचा दर्जा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
व्हॅलेंटाइन डे निमित्त गुलाब सातासमुद्रापार, 70 लाखांची निर्यात, काय मिळतोय दर?
सर्व पहा

मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, "कला क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ आणि कलाकार हे राज्याच्या संस्कृतीचे दूत आहेत. त्यांना कायदेशीर संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. नवीन नियमावलीमुळे या क्षेत्रातील शोषण थांबेल आणि एक शिस्तबद्ध कार्यसंस्कृती निर्माण होईल."

मराठी बातम्या/मनोरंजन/
तासंतास शूटिंग, मानधनाची अनिश्चितता यांचं टेन्शन मिटणार! सिने कलाकारांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल